JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / TV अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; कामाच्या मोबदल्यात झालेली शरीरसुखाची मागणी

TV अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; कामाच्या मोबदल्यात झालेली शरीरसुखाची मागणी

टीव्ही अभिनेत्री (TV Actress) शिव्या पठानिया (Shivya Pathania) सध्या ‘बाल शिव’ (Baal Shiv) या मालिकेमुळे प्रचंड चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने कास्टिंग काउचबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जून-   टीव्ही अभिनेत्री  (TV Actress)  शिव्या पठानिया  (Shivya Pathania)  सध्या ‘बाल शिव’  (Baal Shiv)  या मालिकेमुळे प्रचंड चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने कास्टिंग काउचबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. कास्टिंग काउचबाबत सांगताना ती म्हणाली, जेव्हा तिला 8 महिने कोणतंही काम मिळालं नव्हतं. तेव्हा कामाच्या बदल्यात तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करण्यात आली (Casting Couch) होती. असा धक्कादायक खुलासा अभिनेत्रीने केला आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग काउचचं संपूर्ण सत्य उघड करत शिव्या पठानियाने सांगितलं की, ‘‘जेव्हा तिची पहिली टीव्ही मालिका ‘हमसफर’ बंद झाली तेव्हा तिच्याकडे 8 महिने कोणतंही काम नव्हतं. याच काळात कामाच्या शोधात असताना तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. तिला काम देण्याच्या मोबदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी होत होती. शिव्याने सांगितले की ती सांताक्रूझला (मुंबई) ऑडिशनसाठी गेली होती तो एक खूपच छोटा प्रोजेक्ट होता. तरीही ती तिथे गेली होती. शिव्या पठानियाने पुढे सांगितलं की, ‘जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की ती व्यक्ती (कदाचित निर्माता) एका खोलीत बसली आहे. त्या जाहिरातीत तुम्हाला एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीसोबत काम करायचं असेल तर माझ्याशी तडजोड करावी लागेल.’’ शिव्याने सांगितलं की, त्याच्या रूममध्ये लॅपटॉपवर भजन सुरु होतं. त्यानंतर शिव्या त्याला म्हणाली, तुला लाज वाटत नाही. तुम्ही भजन ऐकत आहात आणि हे काय म्हणत आहात? त्यानंतर ती तेथून निघून गेली’’.परंतु नंतर तिला समजलं की तो कोणीही निर्माता नव्हता तर एक भामटा होता.

संबंधित बातम्या

(हे वाचा: Bigg Boss फेम निक्की तांबोळीने खरेदी केली नवी Mercedes Benz; किंमत ऐकून व्हाल थक्क ) शिव्या पठानियाने ‘बाल शिव’च्या आधी ‘एक रिश्ता साझेदारी का’, ‘महादेव’, ‘राधा कृष्ण’ आणि ‘राम सिया के लव कुश’ सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने बहुतेक धार्मिक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, आता अभिनेत्रीच्या या खुलाशामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या