JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Ashok Saraf Son: कोण आहे अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत? अभिनय नव्हे गाजवतोय 'हे' क्षेत्र

Ashok Saraf Son: कोण आहे अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत? अभिनय नव्हे गाजवतोय 'हे' क्षेत्र

Ashok Saraf Son Aniket Saraf: मराठीतील अष्टपैलू अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी अनेक हिंदी-मराठी सिनेमांमध्ये काम करत स्वतःचा अफाट मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

जाहिरात

कोण आहे अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 एप्रिल- मराठीतील अष्टपैलू अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी अनेक हिंदी-मराठी सिनेमांमध्ये काम करत स्वतःचा अफाट मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. गेली चार दशके ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांनी मराठी मनोरंजनसृष्टीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यांची पत्नी निवेदिता सराफ यासुद्धा एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आईवडील प्रसिद्ध कलाकार असल्याने त्यांचा मुलगासुद्धा याच क्षेत्रात करिअर करेल असं अनेकांना वाटत होतं. पण सर्वांनाच चकित करत अशोक सराफ यांच्या लेकाने एका वेगळ्याच क्षेत्रात करिअर केलं आहे. मराठी सिनेसृष्टी सुरुवातीपासूनच हरहुन्नरी कलाकारांमुळे समृद्ध आहे. यामध्ये अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर या कलाकारांनी तर मराठी इंडस्ट्रीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. या जोड्यांनी इंडस्ट्रीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. यामध्ये सचिन,महेश आणि लक्ष्मीकांत यांच्या मुलांनी आपल्या आईवडीलांच्या पाऊलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात आपलं नशीब अजमावलं आहे. यामध्ये काहींना मोठं मिळालं तर काहींना अजूनही संघर्ष करावा लागत आहे. (हे वाचा: Sai Tamhankar: 3 वर्षे डेटिंग, मग लग्न, अन 2 वर्षातच घटस्फोट; कोण आहे सई ताम्हणकरचा एक्स-पती? ) या सर्व कलाकारांच्या मुलांप्रमाणे अशोक सराफ यांचासुद्धा मुलगा अभिनय क्षेत्रात येणार असंच सर्वांना वाटतं होतं. तसेच अशोक सराफ यांच्या अभिनयाची जादू पाहिल्यानंतर त्यांच्या लेकाला पडद्यावर पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक होते. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशोक सराफ यांच्या लेकाने सर्वानांच चुकीचं ठरवत एका वेगळ्याच क्षेत्राची निवड केली आहे. अशोक सराफ आणि निवेदिता जोशी या मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्याला एकुलता एक मुलगा आहे. त्यांच्या मुलाचं नाव अनिकेत सराफ असं आहे. अनिकेत हा कोणतंही अभिनेता नसून व्यवसायाने एक शेफ आहे. त्याला विविध पदार्थ बनवण्याची सुरुवातीपासूनच प्रचंड आवड होती. याच आवडीला त्याने आपलं करिअर बनवलं आहे. सध्या अनिकेतने एक प्रसिद्ध शेफ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

अनिकेत सराफचं शिक्षण फ्रान्समध्ये झालं आहे. तो भारतीय आणि पाश्चिमात्य दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवण्यात मास्टर आहे. अशोक सराफ यांना आपल्या हातचे ब्राउनी खूप आवडतात. तर आई निवेदिता सराफ यांना मुलाच्या हातचा मार्बल केक प्रचंड आवडतो. अनिकेत सराफ निक सराफ या टोपणनावाने सोशल मीडियावर आपल्या खाद्यपदार्थांचे व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या व्हिडीओ आणि पदार्थाना प्रचंड पसंती मिळत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या