JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Takatak2: 'हृदयी वसंत फुलताना...'; एव्हरग्रीन गाणं नव्या टकाटक रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

Takatak2: 'हृदयी वसंत फुलताना...'; एव्हरग्रीन गाणं नव्या टकाटक रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

अशीही बनवा बनवी या सगळ्यांच्या लाडक्या सिनेमातील हृदयी वसंत फुलताना हे गाणं नव्यानं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तुम्ही पाहिलात का हे नवं गाणं?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 ऑगस्ट: मराठी सिनेसृष्टीतील अजरामर झालेल्या काही कलाकृती आणि त्यांची गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर पाहायला मिळतात. असाच एक एव्हरग्रीन सिनेमा म्हणजे अशी ही बनवा बनवी. सिनेमाल 34 वर्ष पूर्ण झाली असली तरी सिनेमाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायाला मिळतेय. लहानांपासून थोरांपर्यंत या सिनेमानं भुरळ घातली आहे.  सिनेमातील एकाहून एक सरस गाणी आजही मोठ्या आवाजात वाजताना दिसतात. त्यातील एक सर्वांचंं आवडतं गाणं म्हणजे हृदयी वसंत फुलताना. आजही हे गाणं ऐकल्यानंतर प्रत्येक प्रेमीयुगुलाला नवी उर्जा मिळत असेल. हेच एव्हरग्रीन गाणं आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. टकाटकच्या यशानंतर येऊ घातलेल्या टकाटक 2 या सिनेमात हृदय वसंत फुलताना हे गाणं नव्या रुपात लाँच करण्यात आलं आहे. प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, भूमी कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे अशी स्टारकास्ट सिनेमा पाहायला मिळणार आहे. सिनेमा 18 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाला दोन दिवस बाकी असताना सिनेमातील हे नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. हृदयी वसंत फुलताना हे गाणं नव्या रुपात ऐकून प्रेक्षकांनी चांगला प्रसिसाद दिला आहे. प्रेक्षकांना गाणं आवडल्याचं दिसून आलं आहे. हेही वाचा - Bhagya Dile Tu Mala : सानिया करणार का कावेरीला रत्नमालापासून दूर? एपिसोड अपडेट आला समोर

हृदयी वसंती फुलताना या नव्या गाण्यावर एलनाझ ही अभिनेत्री नाचताना दिसत आहे. या एलानानं ‘सॅक्रेट गेम्स’, ‘अभय’, ‘हुत्झपा’ सारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं हे. त्याचप्रमाणे तिचं याआधी ‘ओम’ सिनेमातील ‘काला शा काला’ हे गाणंही गाजलं होतं. तिने अनेक हिंदी सिनेमांमध्ये गाणी केली आहेत. हृदयी वसंत फुलताना या गाण्याच पुर्नलेखन जय अत्रे यांनी केलं आहे. ओरिजीनल गाण्याला धक्का बसू नये याची काळजी जय अत्रे यांनी घेतली आहे. त्यांनी म्हटलंय, या गाण्याबरोबर खूप मोठी नावं जोडली गेली आहेत. त्यामुळे गाणं लिहिण्याआधी मी माझे दोन्ही कान धरले आणि ओरिजनल गाण्याला धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे.  तर श्रृती गाणे हिनं गाणं गायलं आहे. वरुण लिखते यांनी गाण्याला संगीत दिलं आहे तर राहुल संजीरनं गाणं कोरिओग्राफ केलं आहे. हृदयी वसंत फुलताना हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मात्र याआधी टकाटक 2मधील ‘घे टकाटक दे टकाटक’, ‘लगीन घाई’ अशी दोन गाणी प्रदर्शित झाली आहे. या गाण्यांना देखील प्रेक्षकांनी चांगली प्रतिसाद दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या