JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'वारी म्हटलं की फुगडी ही आलीच....' मराठमोळ्या अभिनेत्रीनं देखील आजीबाईंसोबत धरली फुगडी अन् दाखवली महाराष्ट्रीयन संस्कृती

'वारी म्हटलं की फुगडी ही आलीच....' मराठमोळ्या अभिनेत्रीनं देखील आजीबाईंसोबत धरली फुगडी अन् दाखवली महाराष्ट्रीयन संस्कृती

सध्या मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वारीत सहभागी झाली. यावेळी प्राजक्तानं एका आजीबाईंसोबत फुगडी धरली.तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जाहिरात

मराठमोळ्या अभिनेत्रीनं देखील आजीबाईंसोबत धरली फुगडी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जून - आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी करावी असा मोह मराठी माणसाला नक्कीच होतो. टाळ मृदूंगाच्या गजरात बेधुंद होऊन नाचणारे वारकरी पाहिले की खरी तल्लीनता काय असते हे याची जाणीव होते. प्रचंड जनसमुदाय एका विठुरायाला भेटण्यासाठी कित्येक दिवसांची पायपीट करून पंढरीत दाखल होतो. मनात एकमेकांविषयी द्वेष भावना न ठेवता भेदभाव न मानता छोट्यामोठ्यांसमोर नतमस्तक होतात. ही सर्व वारकरी परंपरा महाराष्ट्राच्या मातीत रुजली आणि वाढली. वारकरी संप्रदायाचा हा वसा पुढे चालवणाऱ्यासाठी काही मराठमोळे कलाकार वारीत सहभागी होऊन त्यांची सेवा करताना दिसतात. सध्या मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वारीत सहभागी झाली. यावेळी प्राजक्तानं एका आजीबाईंसोबत फुगडी धरली.तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. प्राजक्तानं देखील वारीत सहाभगी होत वारीचा आनंद घेतला. यावेळी तिनं आजीबाईंसोबत फुगडी धरली. सोशल मीडियावर प्राजक्तानं हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत तिनं म्हटलं आहे की,‘वारी म्हटलं की फुगडी ही आलीच….’ तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून यावर कमेंटचा वर्षाव होत आहे. वाचा- 11 कोटीचा चित्रपट काजोल-राणीनं नाकारला अन् मनीषा-प्रितीचं नशिब चमकलं एका चाहत्याने म्हटलं आहे की,हीच खरी महाराष्ट्रीयन संस्कृती🚩🚩तर आणखी एकानं म्हटलं आहे की, जगात भारी पंढरीची वारी..अशा असंख्य कमेंट या व्हिडिओवर आल्या आहेत.

प्राजक्तानं वारीचे अनेक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. प्राजक्तानं सगळ्यात आधी स्वयंपाक करण्यात सगळ्यांना मदत केली हा व्हिडिओ शेअर करत प्राजक्तानं कॅप्शन दिलं की “आज आषाढी एकादशी निमित्त वारी स्पेशल शूट करत होते… शूटच्या मध्ये मध्ये या माऊलींसोबत स्वयंपाक करताना मन अगदी भरून आलं…” तर प्राजक्तानं दुसरा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत प्राजक्ता विठू माऊलीचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. तर त्यानंतर प्राजक्ता भजन-कीर्तनात मग्न झाल्याचे देखील पाहायला मिळते. हा व्हिडिओ शेअर करत प्राजक्तानं कॅप्शन दिलं की “भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली …जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली.

संबंधित बातम्या

उत्तम अभिनयशैली आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर प्राजक्ता आज लोकांच्यात लोकप्रिय आहे. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्राजक्ताही चाहत्यांशी अनेक नवनवीन गोष्टी शेअर करत असते. प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती सतत सामजिक कार्यक्रमांना भेट देत असते.सर्वसामान्य प्रेक्षकांमध्ये प्राजक्ता फार प्रसिद्ध आहे. प्राजक्ता सध्या टेलिव्हिजनवर कुठेही दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर फोटोशूट शेअर करत असते. तिचे फोटो नेहमीच लक्षवेधून घेत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या