मुंबई, 02 जून- अर्जुन आणि मलायकाने त्यांच्या नात्याची कबुली दिल्यानंतर अनेकांचं लक्ष दोघांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर असतं. मलायकाने फोटो शेअर केल्यावर अर्जुन त्यावर काय कमेंट करतो हे पाहण्याची उत्सुकता साऱ्यांमध्येच असते. एकीकडे मलायका दररोज तिचा एक तरी फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या चाहत्यांना ट्रीट देत असते. नुकतेच मलायकाने तिचे अजून काही हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंवर मलायकाचे चाहते कमेंट करून तिचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे अर्जुनही तिच्या आकंठ प्रेमात बुडालेला दिसत आहे. अर्जुनने मलायकाच्या फोटोवर ‘हमम’ अशी कमेंट केली. त्याच्या या कमेंटचा अर्थ अनेकजण त्याला विचारत आहेत. पण या सगळ्यात मलायकाचा हॉट लुक अर्जुनला पसंत आला आहे. वर्ल्ड कपसोडून बायकोसोबत ग्रीसमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतोय हा क्रिकेटपटू
चाहता असावा तर असा! या सुपरस्टारच्या काही मिनिटांच्या सीनसाठी चाहत्याने खर्च केले १ लाख रुपये या फोटोंमध्ये मलायकाने कोणताही मेकअप न करता फक्त लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती फार मादक दिसत आहे. हे फोटो शेअर करताना मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या मनातली गोष्ट जी फक्त माझ्या जवळच्या मैत्रिणीलाच माहीत असते.’ मलायकाने चार फोटो शेअर केले. जान्हवी कपूरच्या शॉर्ट्सवर कतरिनाची कमेंट, सोनम कपूरने दिलं उत्तर अर्जुनने मलायकाचे हे फोटो पाहिले तेव्हा तो कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. सर्वसामान्यपणे मलायकाचे फोटो अर्जुन फक्त लाइक करतो. त्यावर कमेंट करणं सहसा तो टाळतो. पण यावेळी त्याने ‘हममम’ अशी कमेंट लिहिली. VIDEO: नाशिकच्या गोदावरीत अजय देवगणने केलं वडिलांचं अस्थी विसर्जन