मुंबई, 2 मे- अनेक दिवसांपासून अर्जुन कपूरचे चाहते ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, ती गोष्ट अखेर आज त्यांना मिळाली. अर्जुनच्या बहुप्रतिक्षित India’s Most Wanted चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून अर्जुन त्याच्या चाहत्यांसाठी काही अफलातून घेऊन येत आहे. ही कथा आहे भारतातील अशा कुख्यात गुंडाची जो स्वतःला भारताचा ओसामा बिन लादेन समजतो. या स्वयंघोषीत भारताच्या ओसामाला पाचजण कसे पकडतात ही कथा इंडियाज मोस्ट वॉण्टेड सिनेमात मांडण्यात आली आहे. दोन मिनिटं आणि ३० सेकंदाच्या या ट्रेलरची सुरुवात जबरदस्त अक्शनने होते. मध्ये अर्जुनची तुफान फटकेबाजी दिसत आहे. …और प्यार हो गया ! ‘या’ व्यक्तीमुळे सुरू झाली निक-प्रियांकाची लव्हस्टोरी सत्य घटनेवर आधारीत हा सिनेमा २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. राजकुमार गुप्ता दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती फॉक्स स्टार स्टूडिओ, राजकुमार गुप्ता, मायरा करणने केली आहे. यात २००७ ते २०१३ पर्यंत सात शहरांमध्ये झालेल्या ५२ बॉम्बस्फोटांचा दाखला देण्यात आला आहे. या हल्ल्यात सुमारे ८१० लोख जखमी आणि ४१३ लोकांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येते. कंगना रनौत डॉक्टरांच्या निशाण्यावर, ‘मेंटल है क्या’च्या अडचणीत वाढ अर्जुनशिवाय या सिनेमात अमृता पुरी आणि राजेश शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक म्हणाले की, ‘सध्या प्रेक्षकांना सुपरहिरो असलेले सिनेमे पाहायला आवडतात. अशावेळी माझा सिनेमा हा अशा खऱ्या हिरोची कथा सांगतो जो अनेकांचं आयुष्य वाचवतो.’ काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरमध्ये सर्व हल्ल्यांच्या मागे जी व्यक्ती असते ती सातत्याने एकच गोष्ट सांगताना दिसते ती म्हणजे, ‘शरीर मरतं पण आत्मा मरत नाही. मी लोकांना मारत नाही. फक्त त्यांचा आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात पाठवतो, असं मी नाही गीतेत श्रीकृष्णाने म्हटलं आहे.’ यानंतर टीझरमध्ये चार नवीन व्यक्तिरेखा समोर येतात. हे चारही अर्जुन कपूरसोबत भारतातील दहशतवादी ओसामाला पकडण्याच्या तयारीला लागतात. सिनेमात अर्जुन पुन्हा एकदा अक्शन सीन करताना दिसत आहे. एक्स वाइफ जेनिफर अॅनिस्टनला हे गिफ्ट देण्यासाठी ब्रॅड पिटने खर्च केले तब्बल ५५० कोटी रुपये