JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रणबीरच्या वाढदिवसाला अर्जुन कपूरने आलियाकडे केली खास विनंती; पोस्ट होतेय VIRAL

रणबीरच्या वाढदिवसाला अर्जुन कपूरने आलियाकडे केली खास विनंती; पोस्ट होतेय VIRAL

बॉलिवूड(Bollywood) अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 सप्टेंबर- बॉलिवूड**(Bollywood)** अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अनेक कलाकार रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) आपल्या इन्स्टाग्रामवर एक थ्रोबॅक फोटो शेअर करत खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुनने चक्क आलियालाच (Alia Bhatt) आपला आणि रणबीरचा एखादा चांगला फोटो क्लिक करण्याची विनंती केली आहे.

संबंधित बातम्या

रणबीर कपूरला बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. कपूर कुटुंबातील या अभिनेत्याने तरुणींना भुरळ घातली आहे. रणबीरचा क्युट आणि रोमँटिक अंदाज पाहून अनेक तरुणी त्याच्यावर फिदा होतात. रणबीरने ‘सावरिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. यामध्ये अभिनेत्री सोनम कपूर त्याची सहकलाकार होती. रणबीरने ‘रॉकस्टार, बर्फी, ये जवानी है दिवानीसारख्या अनेक चित्रपटांमधून आपलं अभिनय कौशल्य दाखवून दिल आहे. अभिनेता आजआपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने अनेक कलाकार रणबीरला सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. (**हे वाचा:** HBD: ब्रेकअपनंतर दीपिका पादुकोणसोबत ‘तमाशा’ करणं रणबीर कपूरसाठी होतं फारच कठीण ) नुकताच अभिनेता अर्जुन कपूर रणबीरला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तब्बल १५ वर्षांपूर्वीचा आहे. यामध्ये अभिनेता अर्जुन कपूर, रणबीर कपूर, जुनो चोप्रा, राहुल धवन आणि त्याचा भाऊ आहे. यामध्ये सर्वजण अतिशय वेगळ्या अंदाजात दिसून येत आहेत. या फोटोमध्ये सर्वजण अत्यंत लहान दिसत आहेत. यामध्ये अर्जुन अगदी गुटगुटीत शरीराचा मुलगा दिसत आहे. हा फोटो शेअर करत अर्जुनने अलियाला विनंती केली आहे, ‘कृपा करून आता माझा आणि रणबीरचा एक चांगला फोटो कधी. तसेच अर्जुनने पुढे म्हटलं आहे, केवळ हा एकमेव फोटो आहे. जो पाहून मला वाटतं बर्थडे बॉयसोबत चांगला फोटो असायला हवा. यावेळी काहीच माहिती नव्हतं. मात्र माझ्या छाती फुगवण्याचा अंदाज तर बघा’. असं म्हणत अर्जुनने रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. (**हे वाचा:** HBD: एक बॅकग्राऊंड डान्सर कशी बनली प्रसिद्ध अभिनेत्री; वाचा मौनी रॉयचा अनोखा…. ) सध्या सर्वांनाच माहिती आहे, रणबीर कपूर आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोघे सतत एकत्र दिसून येतात. तसेच सुट्टीचा आनंदही घेत असतात. इतकंच नव्हे तर आलिया आणि रणबीर एकमेकांच्या प्रत्येक फॅमिली फंक्शनमध्ये उपस्थित असतात. तसेच रणबीरच्या वाढदिवसाच्या आधीच आलिया आणि रणबीर जोधपूरला गेलेलं समोर आलं आहे. त्याचबरोबर हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या