मुंबई, 23 डिसेंबर - सलमान खानच्या (Salman Khan) ‘टायगर जिंदा है**’ (Tiger Zinda Hai)** या चित्रपटाच्या रिलीजला बुधवारी चार वर्षे पूर्ण झाली. त्याचबरोबर या चित्रपटाचा पुढील सीक्वल ‘टायगर 3’ देखील लवकरच येणार आहे. या चित्रपटात दिसणारी एक अभिनेत्री आता चांगलीच लोकप्रिय झाली आहे. तिने ‘क्रिमिनल जस्टिस’ आणि ‘असुर’ सारख्या अनेक मालिकांमध्ये आपल्या बोल्डनेसने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘पूर्णा’ची भूमिका साकारणारी अनुप्रिया गोएंका (Anupria Goenka). ती या चित्रपटाबद्दल बोलली आहे. करिअरमधील टर्निंग पॉइंट अनुप्रिया गोयंकाने (Anupria Goenka) या चित्रपटात काम करण्याचा आपला अनुभव सांगितला आहे. हा सिनेमा माझ्या करिअरमधील टर्निंग पॉइंट असल्याचे तिने म्हटले आहे. त्याचवेळी प्रेक्षकांना आता असं वाटत आहे की, आता अनुप्रिया पुन्हा एकदा या चित्रपटात कतरिनाला टक्कर देईल. याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. वाचा- सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत भावुक झाली बहीण श्वेता; केली परत येण्याची मागणी अनुप्रिया ‘काय म्हणाली? अनुप्रिया आनंद शेअर करताना म्हणते, ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. कारण तो माझ्या करिअरमधला टर्निंग पॉइंट होता. पूर्णा ही एक मह्त्त्वपूर्ण भूमिका होती. मी यश राज, आदित्य सरांची यासाठी आभारी आहे. अली अब्बास जफरने मला ही भूमिका साकारण्याची संधी दिली. या पोस्टच्या कमेंटमध्ये आता चाहते अनुप्रियाला आगामी चित्रपटाचा भाग आहेस का असा प्रश्न विचारत आहेत.
कतरिना आणि सलमानसोबत काम करण्याच्या अनुभवावर म्हणाली या चित्रपटाविषयी बोलताना ती म्हणते, ‘आम्ही चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप छान वेळ घालवला. आम्ही दोन महिने अबुधाबीमध्ये होतो आणि सेटवर मी काही चांगले मित्र बनवले. सलमान खान, कतरिना कैफ आणि कुमुद मिश्रासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. शिकण्याची ही एक अद्भुत संधी होती. वाचा- सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत भावुक झाली बहीण श्वेता; केली परत येण्याची मागणी अली अब्बास जफरचे कौतुक या चित्रपटाच्या दिग्दर्शक अली अब्बास जफरचे कौतुक करताना ती म्हणते, ‘‘मला अली अब्बास जफरमध्येही एक चांगला दिग्दर्शक मिळाला. तो नेहमी जमिनीवर असतो, कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास तयार असतो. ‘टायगर जिंदा है’ हा अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे. मी शूटिंग करताना घालवलेला वेळ अजूनही आठवतो. या सीरीजमध्ये दिसणार अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती बहुप्रतिक्षित शो ‘असुर’च्या दुसऱ्या सीजनच्या आणि हॉटस्टारच्या आणखी एका मालिकेच्या रिलीजसाठी तयार आहे. अनुप्रिया गोएंकाने (Anupria Goenka) ऋतिक रोशन सोबत WAR या सिनेमात काम केले आहे.