'अनुपमा' फेम गौरव खन्नाने पत्नीला दिलं इतकं महागडं गिफ्ट
मुंबई, 23 मे- कार विकत घेणं ही एखाद्याची गरज असते, तर एखाद्याचा तो छंदही असू शकतो. कार ड्रायव्हिंग ही अनेकांची पॅशन असते. वेगवेगळ्या ब्रँड्सच्या कार विकत घेणं त्यांना आवडतं. बॉलिवूडमधले कलाकार तर अनेकदा त्यांच्या आवडत्या कार विकत घेताना दिसतात. अनुपमा फेम अभिनेता गौरव खन्ना नंही नुकतीच त्याच्या पत्नीला एक लक्झरी SUV कार भेट दिली. पत्नी अभिनेत्री आकांक्षा चमोला हिला उत्तम ड्रायव्हिंगचा आनंद घेता यावा, यासाठी ही कार भेट दिल्याचं त्याचं म्हणणं आहे. अभिनेता गौरव खन्ना आणि अभिनेत्री आकांक्षा चमोला दोघंही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या खासगी आयुष्यातल्या अनेक गोष्टी ते रील्समधून शेअर करत असतात. दोघांच्या रील्सना त्यांच्या चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. आताही स्वरांगिनी फेम अभिनेत्री आकांक्षा चमोला हिनं इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केलंय. त्यात पती गौरव खन्नानं कार भेट देऊन सरप्राईज दिल्याबद्दल तिनं त्याचे आभार मानलेत. (हे वाचा: Sara-Vicky: अबब!170 लोकांचं कुटुंब, भेटायला पोहोचले सारा-विकी; खाल्ली भाकरी आणि भेंडी ) अभिनेता गौरव खन्नानं पत्नीला फोक्सवॅगनची टायगुन ही गाडी भेट दिली आहे. अभिनेता गौरव खन्नानं त्याच्या या गिफ्ट देण्यामागची भूमिका स्पष्ट केलीय. कार विकत घेण्याआधी मी खूप विचार केला, असं तो म्हणतो. “माझ्या पत्नीला गाडी चालवायला खूप आवडतं. तिला गाडी चालवण्याचा आणखी आनंद मिळावा अशी गाडी मला हवी होती. त्यासाठी मी खूप गाड्यांचा शोध घेतला. मुंबईतल्या रस्ते आणि पार्किंगच्या समस्येमुळे तिला मोठी गाडी नको होती. तिला मध्यम आकाराची SUV हवी होती. म्हणून ही गाडी भेट देण्याचा विचार केला,” असं गौरव खन्ना सांगतो. हे सरप्राईज गिफ्ट होतं. पत्नी आकांक्षाला ते खूप आवडलं. गाडीचा रंगही तिला खूप आवडला असं त्याचं म्हणणं आहे.
पत्नीला लक्झरी गाडी भेट दिली, तरी स्वतःला मात्र लक्झरीपेक्षा गाडीची वैशिष्ट्य जास्त भावतात, असं गौरवला वाटतं. “मला गाड्या आवडतात. पण लक्झरी गाड्याच आवडतात असं नाही. कारण मला पैसा वसूल अशा गोष्टी आवडतात. पैशांचा योग्य मोबदला देणारी गाडी मला जास्त आवडते,” असं तो म्हणतो.“घेतलेल्या कारची किंमत हळूहळू कमी होत जाते. कमवलेले पैसे वाया घालवायला मला आवडत नाही. त्यामुळे जितके पैसे मोजू, त्याचा योग्य मोबदला प्रत्येक गोष्टीत मिळायला हवा असं मला वाटतं. त्यामुळे मी शक्यतो 4 ते 5 वर्षांनी कार बदलतो,” असं तो म्हणतो.
ब्रँड लॉयल्टीबद्दल त्याचं मत फार वेगळं आहे. भविष्यात कोणत्याही एका बँडची गाडी विकत घेण्याचा विचार नसल्याचं तो सांगतो. भारतीय कार उत्पादकही आता चांगल्या गाड्या तयार करत आहेत. त्याचा आनंद आहे, असं तो सांगतो. अभिनेत्री आकांक्षा चमोलानं तिच्या इन्स्टा अकाउंटवर त्यांच्या गाडीचं रील शेअर केलंय. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.