अनुपमा
मुंबई, 09 जानेवारी: हिंदी टीव्ही सीरियल ‘अनुपमा’मध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. हा शो सध्या उत्कंठावर्धक वळणावर आलाय. त्यामुळे आता ‘अनुपमा’ शो मध्ये पुढं काय होणार, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. त्यातच आता अनुपमा आणि अनुजची रोमँटिक क्लिप आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय. सध्या ‘अनुपमा’ हा सर्वांत लोकप्रिय हिंदी शो आहे. या शो मधील ज्या क्षणाची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते, तो क्षण अखेर आलाय. यामध्ये अनुपमा आणि अनुज रोमँटिक होतात. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झालेत. अनुपमा आणि अनुज यांच्यातील दमदार केमिस्ट्रीनं चाहत्यांची मनं जिंकलीत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिप व फोटोंमधील अनुपमा आणि अनुजचा रोमान्स पाहिल्यानंतर एका युजरनं कमेंट केलीय की, ‘हे खूप हॉट आहे.’ तर, दुसऱ्या युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘अनुपमा खूप सुंदर दिसत आहे.’ आता या ट्रॅकनंतर अनुपमा आणि अनुजचं नातं पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल, असा विश्वास युजर्सना आहे. दुसरीकडे, अनुपमा हा शो या रोमँटिक ट्रॅकमुळे ट्विटरवर ट्रेंड करत आहे. 2020 पासून, अनुपमा ही लोकांची पहिली पसंती राहिली आहे, कारण हा शो बाकीच्या सासू-सुनेच्या कथेपेक्षा वेगळा असल्यानं तो जोरदार टीआरपी मिळवतोय. हेही वाचा - Aai kuthe kay karte : मालिकेत होणार अरुंधतीच्या आईची एंट्री; ‘त्याच्याविषयी’ मुलीला देणार महत्वाचा सल्ला अनुपमा अनुजमधील तणाव दूर, आता रोमान्स अनुपमा आणि अनुज यांच्यातील जो काही तणाव होता, तो विसरून नवीन सुरुवात करण्यासाठी अनुपमानं रोमँटिक डेटची योजना केल्याचं तुम्हाला शो मध्ये पाहण्यास मिळेल. अनुपमाला नात्याची नवीन सुरुवात करायची असून, यात ती यशस्वीही झाली. एपिसोडमध्ये अनुपमा आणि अनुज प्रेमात वेडे झालेले दिसत होते. या शो मध्ये दोघांची पहिल्यांदाच जवळीक पाहायला मिळाली. अनुपमा आणि अनुज यांच्यात पॅशनेट किसदेखील पाहायला मिळाले. दोघांनाही प्रेमाचे क्षण एकत्र घालवताना पाहून चाहते खूश झालेत. दोघांचा रोमान्स हा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनलाय. अनुपमा आणि अनुजच्या या धमाकेदार केमिस्ट्रीनं चाहत्यांनासुद्धा वेड लावलं आहे.
अनुपमामध्ये सुरू झाला प्रेम ट्रॅक सोशल मीडियाच्या युजर्सचं म्हणणं आहे की, अनुपमा व अनुज हे दोघेही नवविवाहित जोडप्याच्या व्हाइब्ज देत आहेत. दोघांचा रोमान्स आणि आनंदाचे क्षण पाहून चाहत्यांना असं वाटतं की, आता त्यांच्यामध्ये सर्व काही पूर्वीसारखं होईल. म्हणूनच अनुपमा आणि अनुजच्या रोमान्समुळे, या शो ला टीआरपीमध्ये फायदा होणार हे निश्चित आहे.
खरं तर, अनुपमा हा ऑन एअर झाल्यापासून चाहत्यांचा आवडता शो बनलाय. टीआरपीमध्ये हा शो मुख्यतः पहिल्या क्रमांकावर आहे. अनुज आणि अनुपमाची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. रुपाली गांगुली अनुपमाची भूमिका करत आहे आणि गौरव खन्ना अनुजची भूमिका करत असून दोघांची भूमिका प्रेक्षकांना पसंत पडलीय. त्यामुळेच या शो चा टीआरपी दिवसेंदिवस वाढतोय.