मुंबई, 5 जून : बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव त्यांच्या बिनधास्त विधानांसाठी ओळखले जातात. ते नेहमीच समसामायिक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त करताना दिसतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकदा व्हायरल होत असतात. सध्या अनुभव सिन्हांचं असंच एक ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी भारतीयांना अल्पसंख्यांकांसमोर गुडघे टेकण्याचं चॅलेज दिलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, एक तारीख ठरवा आणि देशातील अल्पसंख्यांकांसमोर गुडघ्यांवर झुकून दाखवा. अनुभव सिन्हा यांनी एक ट्वीट केलं होतं. जे सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं आहे. यावर लोकांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, मी भारतीयांना आव्हान करतो की, एक तारीख ठरवा आणि देशातल्या सर्व अल्पसंख्यांकांच्या समोर गुडघे टेकून दाखवा. 2 ऑक्टोबरला करणार का? माफी मागूयात एवढ्या वर्षांची. ट्विटर आणि फेसबुकमधून बाहेर निघा. याशिवाय त्यांनी आणखी एक ट्वीट केलं. ज्यात त्यांनी लिहिलं, दलित आदिवासी सर्वांबद्दल बोलत आहे.
अनुभव सिन्हा यांची त्यांच्या सिनेमांव्यतिरिक्त त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखले जातात. बॉलिवूडचा भाग असतानाही ते देशातील वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य करताना आणि आपली मतं मांडताना दिसतात. त्यांना सर्वच विषयांचं चौफेर ज्ञानं असल्याचं त्यांच्या विचारांतून दिसून येतं. त्यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्यांनी काही दिवसांपूर्वीच थप्पड या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. यासोबतच ते या सिनेमाचे प्रोड्युसर सुद्धा होते. VIDEO: पाकिस्तानी अभिनेत्यासाठी गुडघ्यावर बसली दीपिका, रणवीरनं दिली ही रिअॅक्शन सनीनं लॉकडाऊनमध्येच सोडली होती मुंबई, आता म्हणते; मला परत यायचंय कारण…