मुंबई, 9 मार्च- ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) होय. अंकिताला आजही लोक अर्चना म्हणूनच ओळखतात. अंकिता या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. अंकिता बॉयफ्रेंड विकीसोबत (Vicky Jain) नुकतंच लग्नाच्याबेडीत अडकली आहे. त्यांनतर ती पतीसोबत ‘स्मार्ट जोडी’ (Smart Jodi) या टीव्ही शोमध्ये सहभागी झाली आहे. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर एक डान्स व्हिडीओ (Dance Video) शेअर केला आहे, जो सध्या फारच चर्चेत आहे. अंकिता लोखंडेने आपल्या इन्स्टाग्रामवर एक डान्स व्हिडिओ शेअरकेला आहे. या व्हिडिओमध्ये ती रेट्रो लूकमध्ये दिसत आहे. तिने चष्माही घातला आहे. यामध्ये ती पती विकी जैनसोबत ‘हरे रामा हरे कृष्णा’मधील ‘दम मारो दम’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यामध्ये अंकिता तिच्या जबरदस्त डान्सिंग स्टेप्स दाखवत आहे. पण अंकिताच्या या डान्सपेक्षा तिच्या सासऱ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचे सासरे विकी आणि तिच्या मागे सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. विकी जैन देखील अंकिता लोखंडेसोबत तितकाच जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. आपल्या डान्सिंग स्टेप्सने तो लोकांची मनेही जिंकत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अंकिताने लिहिले की, “जेव्हा सर्व पुरुष एकाच गाण्यावर नाचतात.. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा.” अंकिता आणि विकीचा हा डान्स लोकांना खूप आवडला आहे.
अंकिता लोखंडे व्हिडीओ शेअर करताच तो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अंकिताचे चाहतेच नव्हे तर तिचे सहकलाकार मित्रसुद्धा तिला कमेंट्स करत आहेत. ‘झाँसी कि राणी’ फेम टीव्ही अभिनेत्री क्रितिका सेंगर धीरने लिहिले, “माफ करा, परंतु तुमच्या मागे असलेले काका भाव खाऊन गेले … खूप गोड.” अभिनेत्री वंदना संजनानी खट्टर हिने ‘हॉटेस्ट’ अशी कमेंट केली आहे. त्याचवेळी अंकिताचे चाहतेसुद्धा मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत.