JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत अंकिता लोखंडेला सेटवरच कोसळलं रडू, इमोशनल VIDEO

सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत अंकिता लोखंडेला सेटवरच कोसळलं रडू, इमोशनल VIDEO

अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपूतसोबत ‘पवित्र रिश्ता’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. तसेच अंकिता आणि सुशांतची केमिस्ट्रीसुद्धा खूप पसंत पडली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 सप्टेंबर-   छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे या आठवड्यात ‘डीआयडी सुपर मॉम’ या रिअॅलिटी शोमध्ये पाहुणी कलाकार म्हणून उपस्थित राहणार आहे. या शोचा एक प्रोमो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच भावुक झालेली दिसून येत आहे. शोच्या आगामी भागात, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत एक परफॉर्मन्स सादर करण्यात आला होता. हा परफॉर्मन्स पाहून अंकिताला अश्रू अनावर झाले. या शोमध्ये अंकितासोबत ‘पवित्र रिश्ता’मधील सहकलाकार आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी देखील उपस्थित आहेत. ‘डीआयडी सुपर मॉम’ मध्य प्रदेशची स्पर्धक सुशांत सिंह राजपूतसाठी परफॉर्म करताना दिसली. हा परफॉर्मन्स पाहून अंकिता आणि उषा नाडकर्णी या दोघीनांही अश्रू अनावर झाले. अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपूतसोबत ‘पवित्र रिश्ता’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. तसेच अंकिता आणि सुशांतची केमिस्ट्रीसुद्धा खूप पसंत पडली होती. हे दोघे ऑफस्क्रीनसुद्धा अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. परंतु त्यांच्या ब्रेकअपने सर्वांनाच धक्का बसला होता. दरम्यान शोमध्ये सुशांत सिंहला समर्पित परफॉर्मन्स पाहिल्यानंतर अंकिता भावुक झाली. यावेळी अंकिता लोखंडे म्हणाली, ‘तो खूप जवळचा मित्र होता… तो माझं सर्वकाही होता.. आणि तो जिथे कुठे आहे तिथे खूप आनंदी राहूदे. देव तिला आशीर्वाद देवो. अंकितासोबत सेटवरील सर्व लोक सुशांतच्या आठवणीत भावुक झालेले दिसून आले. सध्या या शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

(हे वाचा: Laal Singh Chaddha Boycott: ‘जेव्हा विनाशाचं सेलिब्रेशन केलं जातं…’ अतुल कुलकर्णींचं ट्विट चर्चेत **)** हा प्रोमो सोशल मीडियावर येताच सुशांतचे चाहते भावुक आले आहेत. सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी त्याच्या मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. अभिनेत्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. सुशांतने ‘पवित्र रिश्ता’मधील मानव म्हणून करिअरला सुरुवात केली होती. या मालिकेतून त्याला अफाट लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेमुळेच सुशांत आणि अंकिता रिअल लाईफ कपल बनले होते. सुशांतने एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये अंकिताला प्रपोजही केलं होतं. सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर काही वर्षांनी दोघे विभक्त झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या