अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर
**मुंबई, 21 ऑक्टोबर :**सध्या बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा आहेत. नुकतंच सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी येत्या वर्षात लग्न करणार आल्याची माहिती समोर अली होती तर अली फजल आणि रिचा चड्ढा यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. यासोबतच आता अजून एक सेलिब्रिटी कपल असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. हे सेलिब्रिटी कपल म्हणजे अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहेत. आता या दोघांचा दिवाळी पार्टीतील एक व्हिडीओ समोर आला आहे. तेव्हापासून हे दोघे खरंच एकत्र असल्याची खात्रीच चाहत्यांना झाली आहे. करण जोहरने त्याच्या सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण सीझन 7’ मध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे दोघे रिलेशनशिप मध्ये असल्याची चर्चा सुरु केली होती. मात्र, तेव्हा अनन्याने हे मेनी करण्याचं स्पष्ट नकार दिला होता.करण जोहरच्या या शो पासून आदित्य आणि अनन्याची नावे चर्चेत आहेत. असे म्हटले जात आहे की हे दोन सेलिब्रिटी एकमेकांना डेट करत आहेत आणि आता या बातम्यांना अधिक हवा मिळाली जेव्हा दोघे दिवाळी पार्टीत एकत्र वेळ घालवताना दिसले.रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीतून समोर आलेल्या फोटोमध्ये दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे. हेही वाचा - Rupali bhosale : संजनाच्या हातात कोणाचं बाळ? ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष हे फोटो समोर आल्यानंतर आता पुन्हा एकदा दोघांच्या डेटींगच्या अफवा जोरात रंगत असल्याचं दिसत आहे. खरं तर गुरुवारी मनीष मल्होत्राने दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. विशेष म्हणजे या पार्टीत अनन्या आणि आदित्यही पोहोचले होते, तेही जवळपास एकाच वेळी. इथे पोहोचल्यावर दोघांनी फोटोसाठी एकत्र पोजसुद्धा दिली.
एवढेच नाही तर दोघांनीही यावेळी एकाच रंगाचे कपडे घातले होते. मात्र, पार्टीत पोहोचलेल्या सर्व स्टार्सचे कपडे अशाच रंगाचे होते. अनन्या आणि आदित्यचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रत्येकजण एकच प्रश्न विचारत आहे की, आता दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचं या दोघांनी कन्फर्म केलंय का? अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओवर कमेंट करताना अनेक यूजर्सनी आनंद व्यक्त केला तर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली. अनन्या आणि आदित्यच्या व्हिडिओवर कमेंट करत काही युजर्सनी अभिनेत्रीला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. एकाने लिहिले- ‘नाही… ही मुलगी आदित्य रॉय कपूरची गर्लफ्रेंड असू शकत नाही.’ दुसर्याने लिहिले- ‘आदित्यने ही पोज का दिली.’ दुसरा युजर लिहितो- ‘मला अनन्या आदित्यची असल्यासारखे वाटत आहे. एकत्र पोज द्या.’ आता हे दोघे खर्च एकत्र आहेत की त्यांच्या येणाऱ्या चित्रपटासाठी हा प्रमोशनल फंडा आहे हे येणाऱ्या काळात समोर येईल.