अनंत अंबानी यांचा रोका समारंभ पार पडला.
मुंबई, 29 डिसेंबर : रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमॅन उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात एकाच आठवड्यात दोन आनंदाच्या बातम्या आल्या आहेत. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिनं जुळ्या मुलांना जन्म दिला. अंबानी यांच्या घरी दोन चिमुकल्यांच्या आगमनानंतर नव्या सुनेचं आगमन होणार आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची रोका समारंभ म्हणजेच साखरपुडा आज पार पडला. राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात अंबानी आणि मर्चट कुटुंबिय तसेच मित्र मैत्रीणींच्या उपस्थित हा समारंभ पार पडला. अनंत आणि राधिका यांच्यावर सर्वांकडून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राधिका आणि अनंत अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. गेल्या काही महिन्यांपासून ते एमेकांना डेट करत होते. त्यानंतर आता ते लवकरच लग्नबंधनात अडणार आहेत. अनंत अंबानी यांनी यूएसए मधील ब्राउन युनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. तेव्हापासून रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डाचे सदस्य म्हणून विविध पदांवर काम करत आहेत. तर सध्या ते RIL च्या व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत. हेही वाचा - Jio वर्ल्ड सेंटरमध्ये रंगणार नृत्यांगना ‘राधिका मर्चंट’चा अरंगेत्रम सोहळा; बॉलिवूड सेलिब्रेटी लावणार हजेरी
तर अंबानींच्या घराची होणारी धाकटी सून राधिका मर्चंट ही शैला आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिकानं न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवी संपादन केली आहे. तसंच एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते. काही महिन्यांआधीच तिनं भरतनाट्यत या नृत्यप्रकारात अंरग्रेत्रम पूर्ण केलं. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये राधिकाच्या अंरग्रेत्रमचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला होता. राधिका ही अनेक वर्ष ‘श्री निभा आर्ट आर्ट फाउंडेशन’च्या संस्थापिका ‘गुरू भावना ठाकर’ यांच्याकडे भरतनाट्यमचं शिक्षण घेत आहे. राधिकाला ट्रेकिंग आणि स्विमींग करणं आवडतं. राधिका मर्चंट हिचे वडील विरेन मर्चंट ADFफूड्स लिमिटेड कंपनीचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आहेत. त्याचप्रमाणे ते एन्कोर हेल्थकेयर प्राइव्हेट लिमिटेड कंपनीचे सीईओ आणि वाइस चेअरमन आहेत.