मुंबई, 19 ऑक्टोबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना शुक्रवारी रात्री उशीरा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. 77 वर्षीय अमिताभ यांना काही रूटीन चेकअपसाठी मंगळवारी रात्री उशीरा मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशीरा त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मागच्या दोन दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये होते. शुक्रवारी रात्री 10 वाजता ते पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्यासोबत हॉस्पिटलमधून घरी रवाना झाले.
सुत्रांच्या माहितीनुसार अमिताभ यांना रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार त्यांना लीवरची समस्या आहे आणि याविषयी स्वतः अमिताभ बच्चन यांनीच केबीसीमध्ये सांगितलं होतं. सुत्रांच्या माहितीनुसार अमिताभ यांचा लीवर फक्त 25% काम करत आहे असून प्रसिद्ध गेस्ट्रोन्ट्रोलॉजिस्ट डॉ बारवे त्यांच्यावर उपचार करत आहेत. OMG! हेअरस्टाइल बदलल्यामुळे प्रोड्युसरनं अभिनेत्याला दिली जीवे मारण्याची धमकी दरम्यान हॉस्पिटलमध्ये असतानाही अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय होते. गुरुवारी देशभरात करवाचौथ साजरा झाला. या निमित्तानं अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर केला ज्यात ते पत्नी जया बच्चन यांच्यासोबत दिसत आहेत. त्यांनी लिहिलं, ‘खूबसूरती का मुकाबला आज अपने पूरे शबाब पर था, आज एक चांद दूसरे चांद के इन्तजार में था.~ Ef PA करवाचौथच्या सर्वांना शुभेच्छा ज्या आपल्या पतीच्या जीवनासाठी व्रत करतात. ’ सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचं ब्रेकअप, समोर आलं खरं कारण
11 ऑक्टोबरला अमिताभ यांनी 77 वा वाढदिवस साजरा केला. मागच्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं. इलाहाबादमध्ये 11 ऑक्टोबर 1945मध्ये जन्मलेल्या अमिताभ यांनी 1969 मध्ये ‘सात हिंदुस्तानी’ या सिनेमातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. मात्र 1973 मध्ये आलेल्या जंजीर सिनेमात त्यांनी साकारलेल्या पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेनं त्यांना ‘अँग्री यंग मॅन’ ही ओळख दिली. त्यानंतर आलेल्या ‘दिवार’ आणि ‘शोले’ सारख्या सिनेमांनंतर अमिताभ एक महान अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘वयाच्या 15 व्या वर्षी 8 लोकांनी माझ्यावर बलात्कार केला’, KBC स्पर्धकाचा खुलासा ======================================================== पाऊस नाही शरद पवार बरसले, भरपावसातलं UNCUT भाषण