JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Amitabh Bachchan यांनी इतक्या कोटीला विकलं आई-वडिलांचे घर

Amitabh Bachchan यांनी इतक्या कोटीला विकलं आई-वडिलांचे घर

बॉलिवूड अभिनेत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Delhi House Price) यांनी त्यांचं घर विकलं आहे. एकेकाळी या घरात त्यांचे आई-वडील राहत होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Delhi House Price) यांनी त्यांचं घर विकलं आहे. एकेकाळी या घरात त्यांचे आई-वडील राहत होते. त्यांचा हा बंगलो दक्षिण दिल्लीमध्ये होतो. या बंगलोचे नाव ‘सोपान’ असं होते. त्यांच्या आई तेजी बच्चन यांच्या नावावर हा बंगलो रजिस्टर होता. राजधानी गुलमोहर पार्कमधील हे घर बच्चन कुटुंबाचे पहिले घर असल्याचे सांगितलं जाते. एका नवीन रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, अमिताभ बच्चन**(Big B Delhi House Price)** यांनी हे घर 23 कोटीला विकले आहे. या घराला एका कंपनीच्या सीईओने विकत घेतले आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांचा ‘सोपान’ हा बंगलो नेझोन ग्रुप ऑफ कंपनीजच्या सीईओ अवनी बदर यांनी विकत घेतला आहे. अवनी अमिताभ यांना 35 वर्षांपासून ओळखताता. जैपकीने शेअर केलेल्या माहितीनुसार, ही मालमत्ता 418.05 चौरस मीटर क्षेत्रफळात पसरली आहे. 7 डिसेंबर रोजी ही डील झाल्याची माहिती समोर आलेली आहे.अवनी बदरने पोर्टलला सांगितले की, हे घर खूप जुने आहे. त्यामुळे आम्ही आमच्या गरजेनुसार यात बदल करणार आहे. या भागात आम्ही खूप काळापासून राहत आहे. खूप दिवसांपासून आम्ही घराच्या शोधात होतो. जशी ही ऑफर आली तसा लगेत आम्ही होकार कळवला आणि घर विकत घेतले. वाचा- शशांक केतकरच्या Workout चा व्हिडिओ व्हायरल, कशासाठी नेमकी तयारी? रिकामे पडले होते घर दक्षिण दिल्ली आणि दिल्लीमध्ये रिआल एस्टेटचे काम करणाऱ्या प्रदीप प्रजापतीने इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की, अमिताभ बच्चन यांचे वडील जोपर्यंत या घऱात राहत होते तोपर्यंतच या घऱात हालचाल, लगबघ होती. मात्र जेव्हा ते अमिताभ यांच्यासोबत मुंबईला राहण्यासाठी गेले, तेव्हापासून हे घर रिकामे पडले आहे. वाचा- Pushpa ने थलायवाला टाकलं मागे! अल्लूचे रजनीकांत यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स अमिताभ बच्चन यांची प्रॉपर्टी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Mumbai House) पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, सूनबाई ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चनसोबत मुंबईत राहतात. जलसा या निवास्थामध्ये ते आपल्या कुटुंबासोबत राहतात. याशिवाय अमिताभ यांची शहरात अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे.ज्यामध्ये त्यांचे ऑफीस, प्रतीक्षा आणि वत्स याचा समावेश आहे. amitabh-bachchan-delhi-house-sopaan-price-sp

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या