अमिताभ बच्चन
**मुंबई, 10 ऑक्टोबर :**मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा उद्या वाढदिवस आहे. उद्या बिग बी त्यांच्या 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात चाहत्यांमध्ये उत्साह आहे. विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. उद्या त्यांच्या वाढदिवसाचे देशभरात जंगी सेलिब्रेशन केले जाईल. एवढ्या वयात सुद्धा अमिताभ यांचं काम एखाद्या तरुणाला लाजवेल असं आहे. मागच्याच आठवड्यात त्यांचा ‘गुडबाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आणि आज त्यांच्या वाढदिवसाआधी त्यांच्या चाहत्यांना अजून एक भेट मिळाली आहे. अमिताभ बच्चन सध्या गुडबाय या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. दिग्दर्शक विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात बिग बींसह रश्मिका मंदान्ना, नीना गुप्ता, पावेल गुलाटी, सुनील ग्रोव्हर, आशिष विद्यार्थी, एली अवराम यांसारख्या कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय पाहायला मिळाला. आता या चित्रपटानंतर बिग बींचा आगामी ‘उंचाई’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचं पोस्टर रिलीज झालं आहे. त्यांनीच पोस्ट शेअर करत या चित्रपटातील त्यांचा लुक चाहत्यांसमोर आणला आहे. हेही वाचा - SS Rajamouli : एका मुलाची आई असलेल्या महिलेला एसएस राजामौलींनी केलं होतं प्रपोज; पाहा हटके लवस्टोरी उद्या म्हणजेच 11 ऑक्टोबरला बिग बी त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्याआधी आज त्यांनी ‘उंचाई’ या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी त्यांच्या ‘उंचाई’ या चित्रपटाचे नवे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यांच्या कपड्यावरुन हा फोटो एखाद्या बर्फाच्छित परिसरातला असल्याचे लक्षात येते. या फोटोखाली त्यांचे नाव दिले आहे. पोस्टरमध्ये सर्वात शेवटचा भाग चित्रपटातील गाण्यातला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये अमिताभ यांनी नेपाळी टोपी घातली आहे.
उद्या अमिताभ यांचा वाढदिवस आहे. हे निमित्त साधत चित्रपटाच्या टीमने हे पोस्टर आज प्रदर्शित केले. या पोस्टरमधून त्यांनी या पात्राची थोडक्यात ओळख करुन दिली आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करत अमिताभ यांनी लिहिलंय कि, “राजश्री फिल्म्सची खास पेशकश. ११.११.२२ रोजी मला अमित श्रीवास्तवच्या रुपात भेटा. सूरज बडजात्या यांचा ऊंचाई हा चित्रपट जीवन आणि मैत्रीचा उत्सव साजरा करतो.” काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले होते.
राजश्री फिल्म्सने बॉलीवूडमध्ये गौरवशाली 75 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने 2022 मधील सर्वात मोठा चित्रपट म्हणून ओळखला जाणारा, ‘उंचाई’ प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे आणि उत्कृष्ट कलाकार प्रथमच या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, सारिका, नीना गुप्ता आणि परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या, ‘उंचाई’त डॅनी डेन्ग्झोंपा आणि नफिसा अली सोधी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.‘उंचाई’ हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या बरोबर एक महिन्यानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.