JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अमिताभ-आयुष्मान करणार मालक-भाडेकरू बनून तु तु मैं मैं! 'गुलाबो सिताबो'चा ट्रेलर प्रदर्शित

अमिताभ-आयुष्मान करणार मालक-भाडेकरू बनून तु तु मैं मैं! 'गुलाबो सिताबो'चा ट्रेलर प्रदर्शित

महानायक अमिताभ बच्चन आयुष्यमान खुराना स्टारर ‘गुलाबो सिताबो’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुबंई, 22 मे : कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत सिनेमागृहं देखील बंद असल्यामुळे अनेक मोठमोठे चित्रपट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शत होणार आहे. बहुचर्चित ‘गुलाबो सिताबो’ (Gulabo Sitabo) हा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि आयुष्यमान खुराना (Ayushmann Khurrana) स्टारर सिनेमा देखील Amazon प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. शुजित सरकार यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 12 जूनला 200 हून अधिक देशांमध्ये अमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे. थिएटर मालकांमध्ये काहीशी नाराजी असली तरीही लॉकडाऊनमध्ये घरी असलेल्या चित्रपट प्रेमींसाठी मात्र ही खूशखबर आहे. यामध्ये आयुष्मान आणि अमिताभ भाडेकरू आणि मालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दोघांमध्ये चालणार तु तु मैं मैं ट्रेलरमध्येच पाहायला मिळत आहे. अमिताभ-आयुष्यान एकमेकांना बोलण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. (हे वाचा- रिंकू राजगुरूने साडीतील VIDEO केला शेअर, चाहत्याने थेट लग्नाची घातली मागणी ) या ट्रेलरच्या सुरूवातीला लखनऊमधील एका जुन्या हवेलीचा मालक असणारा मिर्झा (अमिताभ बच्चन) त्याचा भाडेकरू बंकी (आयुष्मान खुराना)च्या खोलीतून बल्ब चोरी करताना दाखवलं आहे. बंकी मिर्झाच्या हवेलीमध्ये गेली अनेक वर्ष भाडं न वाढवता तिथे राहत असतो. त्यामुळे मिर्झाला एकतर तो तिथे राहायला नको असतो किंवा त्याने जागा सोडावी असं त्याला वाटत असतं. याकरता मिर्झा म्हणजेच अमिताभ बच्चन काय खटाटोप करतो आणि आयुष्मान कसं त्याचच खरं करत असतो असं या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन यांचा लखनवी अंदाज नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा ठरणार आहे. एका जर्जर झालेल्या हवेलीच्या मालकाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसत आहेत. तरी कधीही भाडं न चुकवणारा भाडेकरू आहे आयुष्मान खुराना. ट्रेलर या हवेली भोवतीच फिरताना दिसत आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे किस्से देखील आयुष्मान आणि अमिताभ यांनी वेळोवेळी शेअर केले आहेत. लॉकडाऊनच्या काळात आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यानंतर विद्या बालनचा शकुंतला देवी हा सिनेमा देखील ऑनलाइन प्रदर्शित करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या