मुंबई, 13 सप्टेंबर: सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणारा लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या चौदाव्या सीझनलाही प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे. या सीझनमधील अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच अमिताभ बच्चन आणि स्पर्धकामधील एक भावूक क्षण सध्या व्हायरल होत याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ‘कौन बनेगा करोडपती 14 ‘मध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने शोचे होस्ट बिग बी अमिताभ बच्चन यांना पत्र लिहून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. कौन बनेगा करोडपतीच्या आगामी भागाचा प्रोमो समोर आला असून यामध्ये ज्योतीमर्य मल्लिक नावाच्या स्पर्धकाने हजेरी लावली. या ओडिशाच्या रहवासी असून व्यवसायाने पोस्ट ऑफिसमध्ये सहाय्यक अधीक्षक आहे. प्रोमोमध्ये पहायला मिळतंय की, ज्योतीमर्य यांनी अमिताभ यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी अमिताभ यांना वाचून दाखवलं.
ज्योतीमर्य यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, ‘आम्ही कधी तुमच्यासारखे बनू शकत नाही हे माहित आहे. मात्र तू आमच्यापैकी एक आहेस हे सिद्ध केले आहेस. ज्या प्रकारे तुम्ही आमच्यासाठी खुर्च्या ओढता, ज्या प्रकारे तुम्ही आमचे अश्रू पुसता आणि खिशात टिश्यू ठेवता. तुम्ही श्रोत्यांमध्ये जाता. कधी कधी वाटतं असा सुपरहिरो शतकातून एकदा येतो’. स्पर्धकाचे हे बोल ऐकून अमिताभ बच्चन भावूक होतात. ‘तुम्ही आता मला भावनिक केलं’, असंही अमिताभ बोलताना दिसतात. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हेही वाचा - ‘I am sorry’; उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतची हात जोडून मागितली माफी?, पाहा VIDEO दरम्यान, सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणारा रिअॅलिटी क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ भारतातील अनेकांचा आवडता शो आहे. आत्तापर्यंत या शोचे 13 सीझन यशस्वीरित्या पूर्ण झाले असून सध्या 14 वा सीझन चांगलाच गाजत आहे. यावेळीही ‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी यावेळीही बिग बी अमिताभ बच्चनच सांभाळत आहेत.