किर्स्टी एली
मुंबई, o6 डिसेंबर : हॉलिवूडच्या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री किर्स्टी एली यांचे निधन झालं आहे. त्या गेला अनेक काळ कॅन्सरशी झुंज देत होत्या. पण त्यांची झुंज अपयशी ठरली असून आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. किर्स्टी एली यांचं वय 71 वर्षे एवढं होतं. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही दुःखद बातमी दिली आहे. त्यांच्या निधनानंतर चाहते शोक व्यक्त करत आहेत. एली यांच्या मुलाने निधनाची माहिती देत म्हटलं आहे,“आमच्या आईची कॅन्सरशी झुंझ अपयशी ठरली आहे. कॅन्सर शेवटच्या टप्प्यात असताना आम्हाला यासंदर्भात माहिती मिळाली होती. त्यानंतर लगेचच आम्ही उपचार सुरू केले होते. कॅन्सरचं निदान झाल्याचं आईला कळल्यानंतर ती निराश झाली नाही…ती लढली….डॉक्टरांनीदेखील प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. त्याबद्दल त्यांचे आभार.’’ हेही वाचा - ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीची मोठी सर्जरी; रग्णालयातून पोस्ट शेअर करत म्हणाली…. त्यांनी पुढे लिहिले आहे कि, ‘‘आमच्या आईचा जीव तिची मुले, नातवंडे आणि तिने वाढवलेले पाळीव प्राणी यांच्यात अडकला होता.तिने या सगळ्यांना अगदी प्रेमाने वाढवले. तिने आपले जीवन खूप आनंदाने जगले. तिने आम्हाला जीवन जगण्याची प्रेरणा दिली आणि ती आमची प्रेरणा होती.’’ एलीच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचं तर तिने पार्कर स्टीव्हनसनशी लग्न केले, त्यानंतर तिने दोन मुलांना जन्म दिला. आज तिच्या निधनानंतर चाहते शोक व्यक्त करत आहेत.
एलीला टीव्ही कॉमेडी शो चीयर्समधून लोकप्रियता मिळाली होती. ‘लूक हूज टॉकिंग’ आणि ‘स्टार ट्रेक सेकंड’ या चित्रपटांमध्येही त्यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. ‘चीअर्स’मधली एमी यांची रेबेका होवे ही भूमिका गाजली होती. या भूमिकेसाठी त्यांना एमी आणि गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘चीअर्स’मुळे एली यांना जगभरात लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांना ‘वेरोनिकाज क्लोसेट’ आणि ‘लास्ट डॉन’मधील कामासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांनी छोटा पडदादेखील चांगलाच गाजवला आहे. ‘डेविड्स मदर’ या मालिकेतील सॅली गुडसन या भूमिकेसाठी त्यांना दुसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार मिळाला.
किर्स्टी एली यांनी 1982 साली मनोरंजनसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली. 1982 मध्ये ‘ट्रॅक 2 : द रॅथ ऑफ खान’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्या अनेक सिनेमांत छोट्या-मोठ्या भूमिकेत झळकल्या. 19987 साली प्रदर्शित झालेल्या ‘समर स्कूल’ हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाने त्यांना लोकप्रियता मिळाली. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाने चांगली कमाई केली होती.