मुंबई, 30 जुलै : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (allu arjun) सध्या सतत चर्चेत असतो. ‘पुष्पा’ सिनेमाच्या भरघोस यशानंतर तर तो आणखीनच प्रकाश झोतात आला आहे. : ‘पुष्पा’ (pushpa movie)चित्रपटानं संपूर्ण भारताला वेड लावलेलं पहायला मिळालं. गेल्या वर्षी पुष्पा पेक्षा मोठा धमाका करणारा अल्लू अर्जुन आता ‘पुष्पा 2’ मुळे चर्चेचा विषय ठरत असतो. चाहते ‘पुष्पा 2 या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर ‘पुष्पा 2’ विषयी चर्चा होत असते. अशातच अल्लू अर्जुनचा नवा जबरदस्त लुक समोर आलाय. त्यामुळे हा फोटो ‘पुष्पा 2’ च्या लुकचा असावा, असा तर्क नेटकऱ्यांनी लावला आहे. अल्लू अर्जुनचा हा लुक सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. अल्लू अर्जुननं त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो फायर नाही तर डबल फायर दिसत आहे. हातात सिगारेट, गडद चष्मा, स्टायलिश केस आणि लेदर जॅकेटमध्ये अल्लू अर्जुन पाहून चाहते हैराण झाले आहेत. या लुकवरुन अल्लूचा हा पुष्पा 2 मधील लुक असल्याचं चाहत्यांकडून म्हटलं जातंय. त्याच्या या नव्या डबल फायर लुकवर चाहत्यांच्या कमेंटचा आणि लाईक्सचा वर्षावर होत आहे. हेही वाचा - आजीला भरवणारी ‘ही’ अभिनेत्री कोण? तुम्ही ओळखलंत का? ‘स्टाईल है बॉस, किलर, ये मस्त था गुरु, सुपर अन्ना, ये पुष्पा 2 का सीन है, स्वॅग, स्टायलीश स्टार, कडक’, अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया चाहते त्याच्या या नव्या पोस्टवर देत आहेत. अल्लूचा हा नवा लुक काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे आता पुष्पा 2 ची आतुरता आणखीनच वाढली आहे आणि प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या भागासाठी उत्सुक आहेत.
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा’नं रेकाॅर्डब्रेक कमाई केली. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या अफाट यशानंतर अल्लू अर्जुनची बॉलिवूडमधील लोकप्रियता गगनाला भिडली आहे. पहिल्यापेक्षा त्याचा चाहतावर्ग आणखीनच वाढला आहे. त्यामुळे चाहते सध्या त्याच्या पुष्पा 2 च्या प्रतिक्षेत आहेत. या चित्रपटाची कधी एकदा अधिकृत घोषणा होतीये याकडे चाहत्यांच्या नजरा आहेत.