JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Alia Bhatt: नातीच्या जन्मानंतर आजी नीतू कपूरची पहिली पोस्ट; आलिया-रणबीरच्या लेकीलाबाबत म्हणाल्या...

Alia Bhatt: नातीच्या जन्मानंतर आजी नीतू कपूरची पहिली पोस्ट; आलिया-रणबीरच्या लेकीलाबाबत म्हणाल्या...

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर नुकतंच आईबाबा बनले आहेत. आलिया भट्टने काही वेळेपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

जाहिरात

नीतू कपूर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 नोव्हेंबर-   बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर नुकतंच आईबाबा बनले आहेत. आलिया भट्टने काही वेळेपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आज सकाळी साडे सातच्या सातच्या सुमारास आलिया भट्टला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी दाखल करण्यात आलं होतं. ही बातमी समोर आल्यापासूनच सर्वांचं लक्ष आलियाकडे लागून होतं. अशातच आता अभिनेत्रीने लेकीला जन्म दिल्याचं समोर येताच सर्वत्र जल्लोषाचं वातावरण झालं आहे. भट्ट आणि कपूर कुटुंबीय नातीच्या आगमनाने भारावून गेले आहेत. दरम्यान आता नातीच्या जन्मानंतर नीतू कपूर यांनी पहिली पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. नीतू कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. या वयातदेखील त्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. त्या सतत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर विविध पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. कधी फोटो तर कधी व्हिडीओ शेअर करत त्या आपल्या दैनंदिन जीवनातील अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. परंतु आजच्या त्यांच्या इन्स्टा पोस्टची गोष्टच निराळी आहे. नीतू सिंग यांची आजची पोस्ट फारच खास आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंग आज आजी बनल्या आहेत. नुकतंच त्यांनी आपल्या नातीचं स्वागत केलं आहे. (**हे वाचा:** ‘‘मुलगी झाली हो….’’ आलिया-रणबीरच्या घरी चिमुकल्या पावलांची एन्ट्री ) आलिया भट्टने लेकीला जन्म दिल्यानंतर कपूर कुटुंब आनंदात न्हाऊन निघालं आहे. त्यांचा आनंद त्यांच्या पोस्टमधून स्पष्ट दिसून येत आहे.नातीच्या जन्मानंतर नीतू सिंग यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. नीतू सिंग यांनी या पोस्टमध्ये लिहलंय, ‘’… आणि आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम बातमी आहे. आमचं बाळ इथे आमच्यासोबत आहे… आणि ती काय चमत्कारिक मुलगी आहे. आम्ही अधिकृतपणे प्रेमाचा विस्फोट करत आहोत. धन्य पालक, खूप प्रेम प्रेम प्रेम आलिया आणि रणबीर’.

संबंधित बातम्या

आलिया भट्टची सासू आणि रणबीर कपूरची आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आहेत. जिथे आलिया भट्टला दाखल करण्यात आलं आहे. नीतू यांच्या आधी आलियाची आई सोनी राजदानदेखील आपल्या मुलीला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आहेत. दुसरीकडे महेश भट्ट यांनीही मुलीच्या डिलिव्हरीनंतर आनंद व्यक्त केला आहे. आता रणबीर-आलिया अधिकृतपणे आई-वडील झाल्यामुळे सोशल मीडियावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनीनेदेखील आलिया-रणबीरच्या पालक बनण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आलियाच्या डिलिव्हरीमुळे कपूर आणि भट्ट कुटुंबातही आनंदाचं वातावरण आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी एप्रिलमध्ये लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर, जूनमध्ये, अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली करत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या