मुंबई, 15 ऑक्टोबर : अभिनेत्री आलिया भट नेहमीच तिच्या न विचार करता विधान करण्याच्या सवयीमुळे चर्चेत असते. करण जोहरच्या चॅट शोमध्ये एक प्रश्नाचं काहीतरी भलतंच उत्तर दिल्यानं आलिया काही वर्षांपूर्वी प्रचंड ट्रोल झाली होती. त्यानंतर तिच्या बोलण्याची नेहमीच खिल्ली उडवली जाते. पण नुकत्याच झालेल्या एका इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा आलियाची जीभ घसरली आणि योगायोग असा की यावेळीही ती करण जोहरच्याच प्रश्नाचं उत्तर देत होती. करणच्या प्रश्नाचं उत्तर देताना आलियाच्या तोंडून अश्लील शब्द निघाल्यानं उपस्थित प्रेक्षकांमधून एकच गोंधळ ऐकू आला. रविवारी आलिया भटनं करिना कपूरसोबत जियो मामी मूव्ही मेला विथ स्टार्स 2019 (Jio MAMI Movie Mela with Star)मध्ये हजेरी लावली. यावेळी निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याच्यासोबत या दोघींनीही गप्पा मारल्या. प्रश्नोत्तरांच्या या सेशनमध्ये करणच्या प्रश्नांची उत्तरं देताना आलियानं करिनाची खूप स्तुती केली Sheer Qorma लेस्बियन लव्ह स्टोरी सांगणारा नव्या सिनेमाचा लुकने भुवया उंचावल्या
आलिया म्हणाली, ‘करिनानं अनेक सिनेमात काम केलं. लोक म्हणतात, लग्न झाल्यानंतर तुमच्या कामाचा वेग मंदावतो. मात्र करिनाच्या बाबतीत असं झालं नाही. मुलं झाल्यानंतर तुम्ही पुन्हा या इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करु शकत नाही. पण करिनाच्या बाबतीत असंही झालं नाही. ती नेहमीच माझ्यासाठी आणि माझ्या मित्रमैत्रीणींसाठी प्रेरणास्थान आहे. जेव्हा आम्ही तिचे फोटो पाहतो. तेव्हा विचार करतो ही किती हॉट आहे. किती सुंदर आहे. इतकंच नाही तर ती सध्या चप्पल, ट्रॅक पॅन्ट आणि टीशर्टमध्येही खूप सुंगर दिसते.’ हे सर्व बोलता बोलता, आलियाच्या तोंडून एक अश्लील शब्द निघाला आणि हे ऐकल्यावर कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. 90 च्या दशकातील ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आता झाली पॉर्न स्टार आलियाच्या तोंडून बाहेर पडलेली ही शिवी खरं तर करण जोहरनं ऐकली नाही मात्र जेव्हा करिनानं त्याला आलिया काय बोलली हे सांगितलं त्यावर करणलाही हसू आवरलं नाही आणि त्यावर त्यानं आलियाला विचारलं तुला मी हिच शिकवण दिली का?
काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या चॅट शोमध्ये आलिया भटला त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आलियानं ‘पृथ्वीराज चौहान’ असं उत्तर दिलं होतं. ज्यानंतर तिच्या या उत्तरावर अनेक मीम्स तयार करण्यात आले होते. जियो मूव्ही मेला विथ स्टार्स 2019 मध्ये आलिया करणनं विचारलं, ‘तुला कधी वाटलं होतं का की करिना कपूर तुझी ननंद होईल.’ त्यावर करिना अचानक मध्येच बोलली, ‘असं झालं तर मी या जगतली सर्वात नशीबवान मुलगी असेन.’
आलिया मात्र करणच्या या प्रश्नावर चक्क लाजताना दिसली. ती म्हणाली, खरं सांगू तर मी असा विचार कधीच केला नव्हता आणि आताही मी याबद्दल विचार करत नाही. हा ब्रिज पार करुन आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. आलिया उत्तर देताना टाळाटाळ करत आहे हे पाहिल्यानंतर करण गप्प बसला नाही. तो म्हणाला, जेव्हाही असं होईल मी आणि करिना त्यादिवशी खूप खूश असू आणि हातात ताट घेऊन उभे राहू. KBC11: पत्नीच्या हट्टामुळे हनी झाला ‘करोडपती’ धनी, विजेता 7 कोटीही जिंकणार का? ========================================================= मनसेसाठी निवडणुकीच्या प्रचारात उतरला अभिनेता सिद्धार्थ जाधव, पाहा VIDEO