JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / …म्हणून शूटिंग अर्धवट सोडून Alia Bhatt मुंबईत परतली

…म्हणून शूटिंग अर्धवट सोडून Alia Bhatt मुंबईत परतली

सिनेमाचं काही चित्रीकरण दुसऱ्यांदा शूट करावं लागत असल्यामुळे संपूर्ण टीम दुसऱ्यांदा वाराणसीत शूट करत आहे. पण आता तेही सोडून आलिया मुंबईत परतली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून- आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या त्यांच्या ब्रह्मास्त्र सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. सिनेमाचं काही चित्रीकरण दुसऱ्यांदा शूट करावं लागत असल्यामुळे संपूर्ण टीम दुसऱ्यांदा वाराणसीत शूट करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाचं नियमित चित्रीकरण होत असताना अचानक आलिया चित्रीकरण सोडून मुंबईत परतली. एका एण्टरटेनमेन्ट वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सोमवारी चित्रीकरणादरम्यान, अचानक आलियाच्या पोटात दुखायला लागलं. आलियाला चित्रीकरण पूर्ण करायचं होतं पण सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीने पॅकअप करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एक गाणं शूट व्हायचं होतं. पण सिनेमाची टीम नोव्हेंबरमध्ये पुन्हा वाराणसीत येऊन हे गाणं शूट करणार आहे. आलिया आणि रणबीरवर हे गाणं शूट केलं जाणार आहे. आलिया आणि रणबीरला नुकतंच मुंबई एअरपोर्टवर पाहण्यात आलं. दोघं मुंबईत एकत्र जरी आले तरी एअरपोर्टवर पोहोचताच दोघं वेगवेगळ्या गेटने बाहेर पडले. लुकबद्दल बोलायचे झाले तर रणबीरने काळ्या रंगाचं टीशर्ट, डेनिम जीन्स आणि टोपी घातली होती. तर आलियाने नियॉन रंगाची ट्राउझर आणि जॅकेट घातलं होतं. मराठी दणका! स्वप्नील जोशीच्या मॅजिकसमोर तापसी पन्नूही पडली फिकी

‘रंगून’मध्ये Kangana Ranaut सोबतच्या किसिंग सीनला Shahid Kapoor म्हणाला चिखल? याआधी वाराणसीच्या चेत सिंह घाटावर ब्रह्मास्त्र सिनेमाचं चित्रीकरण सुरू असताना सुरक्षा रक्षकांनी लोकांना तेथे येण्यास मज्जाव केला होता. यामुळे सुरक्षा रक्षक आणि पर्यटकांमध्ये बाचाबाचीही झाली होती. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं होतं. एका पत्रकार परिषदेत आलियाने ती १० दिवसांमध्ये काशीच्या संस्कृतीशी एकरुप झाल्याचं म्हणाली होती. चाट, बनारसी पान, ठंडई आणि लस्सी या सगळ्याचाच तिने मनमुराद आनंद लुटल्याचं सांगितलं. VIDEO : नवी मुंबईत शाळेजवळ आढळली बाँब सदृश वस्तू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या