आलिया भट्ट
मुंबई, 20 जानेवारी- बॉलिवूडमध्ये सतत चर्चेत असणारं एक कुटुंब म्हणजे भट्ट कुटुंब होय. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या भट्ट कुटुंबाबाबत एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे. ती गोष्ट म्हणजे बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेत्री आलिया भट्ट चे वडील महेश भट्ट यांची हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आलिया भट्टचा भाऊ राहुल भट्टने या बातमीवर शिक्कामोर्तब करत महेश भट्ट यांची हेल्थ अपडेट दिली आहे. गेल्या महिन्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हार्ट चेकअपमध्ये काही तक्रारी दिसून आल्या होत्या. त्यांनतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चार दिवसांपूर्वी महेश भट्ट यांच्यावर हृद्य शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबत आता त्यांचा मुलगा आणि आलिया भट्टचा सावत्र भाऊ राहुल भट्टने प्रतिक्रिया देत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. **(हे वाचा:** Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने माजी मॅनेजरविरोधात केलेली ‘ती’ तक्रार न्यायालयाकडून रद्द;देसी गर्लसोबत नेमकं काय घडलं? ) या रिपोर्टनुसार, राहुल भट्टने सांगितलं की, त्यांचे वडील दिग्दर्शक महेश भट्ट यांना या आठवड्याच्या सुरुवातीला रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. राहुलने पुढे म्हटलं, शेवट चांगलं तर सर्वकाही चांगलं. आता ते ठीक आहेत. त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा बरी आहे. आणि आता ते घरी परतले आहेत. याबाबत तुम्हाला जास्त माहिती नाही देऊ शकत कारण रुग्णालयात जास्त लोकांना जाण्याची परवानगी नव्हती'.
महेश भट्ट हे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखकसुद्धा आहेत. त्यांनी 1974 पासून चित्रपटांचं दिग्दर्शन करायला सुरुवात केली होती. 1984 मध्ये आलेल्या त्यांच्या ‘सारांश’ या चित्रपटाने तुफान प्रसिद्धी मिळवली होती. महत्वाची बाब म्हणजे 14 व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आला होता. त्यासोबतच त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. शेवट त्यांनी ‘सडक २’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यामध्ये संजय दत्त, आदित्य रॉय कपूर आणि त्यांची धाकटी लेक आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका होत्या.