JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Alia-Ranbir: कन्स्ट्रक्शन साईटवर प्रेग्नंट आलियासाठी रणबीरने केलं असं काही; VIDEO जिंकेल तुमचं मन

Alia-Ranbir: कन्स्ट्रक्शन साईटवर प्रेग्नंट आलियासाठी रणबीरने केलं असं काही; VIDEO जिंकेल तुमचं मन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आईबाबा बनणार आहेत. आलिया आणि रणबीर आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्याआधी त्यांच्या नवीन घराची तयारी करत आहेत.

जाहिरात

आलिया भट्ट रणबीर कपूर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 सप्टेंबर-   बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आईबाबा बनणार आहेत. आलिया आणि रणबीर आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्याआधी त्यांच्या नवीन घराची तयारी करत आहेत. नुकतंच हे जोडपं त्यांच्या नवीन घराच्या बांधकाम साइटवर दिसून आलं. सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडिओमध्ये, रणबीर आणि आलिया आपल्या नवीन घराचं निरीक्षण करताना आणि इंटीरियर डिझायनरशी गप्पा मारताना दिसून आले. दरम्यान या व्हिडीओमध्ये असं काही दिसून आलं की त्याची प्रचंड चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये लवकरच आई होणारी अभिनेत्री आलिया भट्ट गुलाबी आणि काळ्या रंगाच्या शर्ट आणि पँट अशा कॅज्युअल लुकमध्ये दिसून आली. आपल्या प्रेग्नेन्सीमध्येही आलिया भट्ट सतत स्टायलिश अंदाजात वावरताना दिसून येते. दुसरीकडे, व्हिडिओमध्ये रणबीर कपूरने निळ्या जीन्ससह पांढरा टी-शर्ट आणि निळी कॅप कॅरी केली होती. हा व्हिडिओ व्हायरल होताच रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. पाहूया या व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलंय. आलिया आणि रणबीर बऱ्याचवेळा आपल्या नव्या घराच्या बांधकाम साईटवर दिसून येतात. आजही असंच काहीसं झालं आहे. नुकतंच आलिया पती आणि अभिनेता रणबीर सोबत आपल्या नव्या घराच्या बांधकाम साईटवर गेली होती. याठिकाणी ते आपल्या नव्या घराचं निरीक्षण करत होते. तसेच आपल्या इंटेरियर डिझायरशी गप्पा मारत होते. दरम्यान आलिया भट्ट पुढे येऊन बाल्कनीत खाली वाकून बघताना दिसून आली. विशेष म्हणजे आलिया किंचितशी पुढे येताच रणबीरने काळजीपोटी आपल्या पत्नीचा हात पकडला. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ समोर येताच वेगाने व्हायरल झाला आहे. सर्वजण या जोडप्याचं आणि खाकरुन रणबीरचं कौतुक करत आहेत. रणबीरला अनेकांनी कमेंट करत रिअल हिरो म्हटलं आहे. तर काहींनी आलियासाठी नेहमीच प्रोटेक्टिव्ह असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी कमेंट करत रणबीर इतर कलाकारांसारखा फक्त कॅमेऱ्यासमोर पत्नीचा हात पकडून चालणारा अभिनेता नसून खरोखर त्याला आपल्या पत्नीची काळजी असल्याचं म्हटलं आहे. सध्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

संबंधित बातम्या

**(हे वाचा:** Mouni Roy B’day: 15 व्या वर्षी अभिनेत्रीने सुरू केलं करिअर; आज आहे कोट्यावधींची मालकीण ) हे स्टार कपल नुकतंच अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात झळकले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान लोकप्रिय ठरला आहे. या चित्रपटात रणबीर कपूरने ‘शिवा’ची भूमिका साकारली आहे. तर आलिया भट्टने ‘ईशा’ची भूमिका साकारली आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन आणि शाहरुख खान देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या