JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Diwali 2022: सासरी पोहोचली प्रेग्नेंट आलिया भट्ट; थाटामाटात केलं लग्नानंतरच पहिलं लक्ष्मी पूजन

Diwali 2022: सासरी पोहोचली प्रेग्नेंट आलिया भट्ट; थाटामाटात केलं लग्नानंतरच पहिलं लक्ष्मी पूजन

कारण आलिया भट्ट सध्या गरोदर असल्याने तिने पार्ट्यांमध्ये जाणं टाळलं असावं. मात्र काल लक्ष्मीपूजनसाठी आलियाने आपली सासू आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांच्या घरी हजेरी लावली होती.

जाहिरात

आलिया भट्ट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 ऑक्टोबर-  देशभरात बघता-बघता दिवाळी ला सुरुवातदेखील झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून सर्वसामान्य लोक असो किंवा सेलिब्रेटी सर्वजण दिवाळीच्या तयारीत व्यग्र होता. कुणी घराची साफसफाई करत होतं, कुणी खरेदी करत होतं, कुणी घराची सजावट करत होतं, तर कुणी फराळ बनवण्यामध्ये व्यग्र होतं. काळापासून दिवाळीची सुरुवात झाली आहे. परंतु दिवाळी आधीच बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक मोठमोठ्या सेलेब्रेटींनी हजेरी लावली होती. परंतु या सर्व पार्ट्यांमध्ये इशा-शिव अर्थातच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर कुठेच दिसले नाहीत. कारण आलिया भट्ट सध्या गरोदर असल्याने तिने पार्ट्यांमध्ये जाणं टाळलं असावं. मात्र काल लक्ष्मीपूजनसाठी आलियाने आपली सासू आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांच्या घरी हजेरी लावली होती. आलिया भट्ट सध्या गरोदर आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आलिया भट्ट आपल्या कामात प्रचंड व्यग्र होती. अभिनेत्री आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती. आलिया गरोदर असूनसुद्धा सतत शहरांमध्ये प्रवास करत होती. विविध कार्यक्रमांत भाग घेत होती. त्यामुळे तिला सध्या आरामाची गरज असावी असं म्हटलं जात आहे. त्यामुळेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यंदा कोणत्याही दिवाळी पार्टीत दिसून आले नाहीत. आलिया आणि रणबीर कपूर सध्या एकमेकांसोबत आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणं पसंत करत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी आलिया भट्टचं डोहाळजेवणदेखील पार पडलं. यामध्येसुद्धा फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. (हे वाचा: Diwali 2022: लग्नानंतर आलिया भट्ट-रणबीर कपूरची पहिली दिवाळी; काय आहे कपलचा खास प्लॅन? **)** नुकतंच आलिया भट्टने आपली यंदाची दिवाळी कशी आहे याची झलक दाखवली आहे. आलिया भट्टने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये आलियाने गेल्या वर्षीच्या दिवाळीचा एक फोटो आणि आत्ताचा एक फोटो शेअर केला आहे. गेल्यावर्षी दिवाळीत आलिया निळ्या रंगाच्या सुंदर अशा लेहेंग्यामध्ये दिसली होती. हातात पणती घेऊन अभिनेत्रीने फोटोशूटदेखील केलं आहे. मात्र यंदा आलिया आपल्या बेडरूममध्ये बेडवर आराम करताना दिसून येत आहे. यामध्ये आलिया रोजच्या कपड्यांमध्ये दिसून येत आहे. अर्थातच तिला आरामाची सक्त आवश्यकता आहे.

संबंधित बातम्या

तर दुसरीकडे आलियाच्या सासू आणि रणबीरची आई नीतू कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या,ध्ये आलिया आणि रणबीरसुद्धा दिसून येत आहेत. काल नीतू कपूर यांनी आपल्या घरी दिवाळीनिमित्त लक्ष्मी पूजन केलं. लक्ष्मी पूजनसाठी आलिया आणि रणबीर कपूरने हजेरी लावली होती. यावेळी आलिया भट्टची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्टदेखील उपस्थित होत्या. एकंदरीत आलिया आणि रणबीर कपूरने आपली यंदाची दिवाणी अगदी साधपणाने आपल्या कुटुंबासोबत साजरी केली आहे.

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान अभिनेता रणबीर कपूरला दिवाळीच्या प्लॅन्सबद्दल विचारण्यात आलं होतं. याबाबत उत्तर देत रणबीरने म्हटलं, ‘आम्ही दीदी करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घरी दिवाळी सेलिब्रेशनसाठी गेलो होतो. त्यांनी सर्व कुटुंबीयांना दिवाळीनिमित्त आपल्या घरी बोलावलं होतं. कुटुंबातील सर्व सदस्यांनी तिथेच दिवाळी साजरी केलीय. रणबीर पुढे म्हणाला, असं असलं तरी, जेव्हा सर्व कुटुंबीय एकत्र येतात तेव्हा तीच आपल्यासाठी पार्टीसारखी असते.रणबीर आपल्या कुटुंबाच्या आणि सर्व बहिणींच्या फारच आहे. अभिनेता सोशल मीडियापासून दूर असला तरी कुटुंबातील सदस्य सतत त्यांच्यासोबतच्या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या