JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / फ्रेंड्ससोबत आलिया करत होती TikTok Video, पण झाली ‘गलती से बिग मिस्टेक’

फ्रेंड्ससोबत आलिया करत होती TikTok Video, पण झाली ‘गलती से बिग मिस्टेक’

आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात ती तिच्या मैत्रिणींसोबत कूल अंदाजात व्हिडीओ शूट करताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट तिच्या सिनेमांव्यतिरिक्त तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सुद्धा अनेकदा चर्चेत असते. सध्या बॉलिवूडकरांमध्येही TikTok ची क्रेझ पाहायला मिळत आहे. शिल्पा शेट्टी, रितेश देशमुख यांच्या सारखे कलाकार टिकटॉकवर सतत सक्रिय असतात. यात आता आलिया भटची सुद्धा भर पडली आहे. पण आता आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात ती तिच्या मैत्रिणींसोबत कूल अंदाजात व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. आलिया भटनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती फिंगर चॅलेंजवाला व्हिडीओ बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ आलियाची मैत्रीण आकांक्षा रंजन कपूरनं तिच्या टिकटॉकवर अपलोड केला आहे. त्यानंतर हाच व्हिडीओ आलियानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 15 मार्चला आलियानं 27 वा वाढदिवस साजरा केला. कोरोना व्हायरसमुळे यंदा आलियानं तिचा वाढदिवस तिच्या जवळचे मित्रमैत्रिण आणि कुटुंबीयांसोबत साजरा केला. यावेळीच तिनं आकांक्षा रंजन, मेघना गोयल आणि शाहीन भट यांच्यासोबत हा व्हिडीओ बनवला होता. गायिका कनिका कपूर Coronavirus पॉझिटीव्ह, 300 लोकांसोबत केली होती पार्टी

आलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आलियाचा हा कुल अंदाज सर्वांना आवडत आहे. सर्वच तिच्या या कुल अंदाजाचं खूप कौतुक करताना दिसत आहे. पण या व्हिडीओमध्ये तिच्या मैत्रीणीनं एक अशी हरकत केली आहे ज्यामुळे आलियाचे चाहते नाराज आहेत. जान्हवीनं केलं बहीण खुशीच्या चेहऱ्यावर पेंटिंग, VIDEO पाहिल्यावर पोट धरून हसाल या व्हिडीओच्या शेवटला आलिया आणि तिच्या मैत्रिणी मिडल फिंगर दाखवतात. आलियाच्या व्हिडीओमधील हीच गोष्ट तिच्या चाहत्यांना आवडलेली नाही. मात्र अद्याप तरी याबात कोणीही तिला ट्रोल केलेलं नाही. सर्वजण तिच्या स्वॅग अंदाजाचं कौतुक करत आहेत. शिल्पा शेट्टीनं आता केली अभिनेता राजपाल यादवची धुलाई, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या