मुंबई, 4 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी ‘ऐतराज’ आणि ‘मुझसे शादी करोगी’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र अनेक वर्षांपासून ही जोडी एकत्र दिसलेली नाहीये. दोघांचे चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे 2005 मध्ये शूट झालेलं हे गाणं तब्बल 17 वर्षांनंतर रिलीज झालं आहे. ‘वो पहली बरसात’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात दोघांची जबरदस्त केमिस्ट्री दिसत आहे. गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीस आलं असून या गाण्यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. हेही वाचा - Mega Blockbuster Trailer: ना चित्रपट, ना सिरिज, कपिल शर्मा-दीपिका पदुकोणच्या मेगा ब्लॉकबस्टरचं सत्य आलं समोर ‘बरसात’ चित्रपटासाठी प्रियांका आणि अक्षयने हे गाणं शूट केलं होतं. मात्र काही कारणास्तव अक्षयने हा चित्रपट सोडला. यानंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी प्रियांकाला घेऊन बॉबी देओलला मुख्य भूमिकेत घेऊन चित्रपट बनवला. बॉबी देओल आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे कुमार सानू यांनी गायले आहे. अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचं गाणं समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनमध्ये आनंद पहायला मिळत आहे.
बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडशी संवाद साधताना दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी या गाण्याबद्दल आणि चित्रपटाविषयी चर्चा केली होती. त्यांनी सांगितले होते की अक्षय आणि आणि प्रियांकाने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती आणि दोघांनी एकत्र शीर्षक ट्रॅक देखील शूट केला होता. पण अक्षयला या दरम्यान त्याच्या काही ‘कौटुंबिक समस्या’ आल्या. नाहीतर त्यानं चित्रपट असा सोडला नसता. यावेळी अक्षय आणि प्रियांकाची जवळीक वाढत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.