JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आराध्यानं असे मानले कोरोना योद्ध्यांचे आभार, ऐश्वर्या रायने शेअर केला PHOTO

आराध्यानं असे मानले कोरोना योद्ध्यांचे आभार, ऐश्वर्या रायने शेअर केला PHOTO

ऐश्वर्या-अभिषेकची मुलगी आराध्या बच्चन देखील लॉकडाऊनमध्ये तिच्यातील सुप्त गुणांना वाव देत आहे. तिने रंगाच्या मदतीने कोरोनाशी (Coronavirus) लढणाऱ्या सर्वांना बच्चन कुटुंबातर्फे धन्यवाद दिले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 मे : कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे अनेकांचं आयुष्य स्थीर झाले आहे. शाळेत, घराबाहेर, गार्डनमध्ये कल्ला करणारी मुलं आज घरातच आहेत. मग अशावेळी त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे विविध प्रयत्न पालकांकडून सुरू आहेत आणि हे छोटे-मोठे उपक्रम करताना मुलं देखील एन्जॉय करत आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai-Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची मुलगी आराध्या बच्चन ही देखील लॉकडाऊनमध्ये तिच्यातील सुप्त गुणांना वाव देत आहे. तिने रंगाच्या मदतीने कोरोनाशी (Coronavirus) लढणाऱ्या सर्वांना बच्चन कुटुंबातर्फे धन्यवाद दिले आहेत. (हे वाचा- ‘गव्हाच्या पिशवीतून पैसे पाठवणारा मी नव्हे’,व्हायरल VIDEO बाबत आमीर खानचा खुलासा ) आराध्याने काढलेल्या या चित्रामध्ये तिने पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार, शिक्षक, पत्रकार, नर्सेस आणि जवान या सर्वांचे आभार मानले आहेत. दरम्यान तिने या चित्रामधून अभिषेक, ऐश्वर्या आणि तीच्या स्वत:कडून या साऱ्यांचे आभार मानले आहेत. ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्रामवरून हा फोटो शेअर केला आहे. आराध्याचे गोड धन्यवाद पाहून अनेकांनी ऐश्वर्याच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.  आराध्याने या चित्रातून घरी राहा आणि सुरक्षित राहा असा संदेश देखील दिला आहे.

ऐश्वर्या आराध्याबरोबरचे अनेक फोटो शेअर करत असते. आराध्या सध्याच्या प्रसिद्ध स्टार किड्स पैकी एक आहे. तिचा हा फोटो 2 लाखांहून अधिक युजर्सनी लाइक केला आहे. सध्या कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांना अशाच छोट्या-छोट्या कृतींमधून मनोधैर्याची  गरज आहे अशी प्रतिक्रिया काही युजर्सनी दिली आहे. संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या