JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सारानंतर हृतिक रोशनच्या बहिणीला डेट करतोय कार्तिक आर्यन, कोण आहे ती?

सारानंतर हृतिक रोशनच्या बहिणीला डेट करतोय कार्तिक आर्यन, कोण आहे ती?

बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्यांपैकी एक असलेला कार्तिक आर्यन आता अनेकांच्या मनावर राज्य करतो. कार्तिकचा चाहतावर्ग मोठा असून त्याचं आणि त्याच्या चाहत्यांचे बॉन्डिंग कायमच दिसून येतं.

जाहिरात

कार्तिक आर्यन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 नोव्हेंबर :  बॉलिवूड मधील अव्वल अभिनेत्यांपैकी एक असलेला कार्तिक आर्यन आता अनेकांच्या मनावर राज्य करतो. कार्तिकचा चाहतावर्ग मोठा असून त्याचं आणि त्याच्या चाहत्यांचे बॉन्डिंग कायमच दिसून येतं. कार्तिक त्याच्या कामामुळे तर चर्चेत असतोच त्याचबरोबर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. सध्या कार्तिक आर्यनच्या डेटिंगबाबात अनेक चर्चा रंगल्या असून सोशल मीडियावर हाच विषय पहायला मिळत आहे. ‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, ‘हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन सध्या हँडसम हंक कार्तिक आर्यनच्या प्रेमात आहे. दोघेही अनेकदा एकमेकांच्या घरी भेटत असतात. यावरून कार्तिक आणि पश्मिना हे फक्त ‘चांगले मित्र’ नसूनही अधिक आहेत हे दिसून येतंय. जेव्हा तो काम करत नसतो तेव्हा त्याला पश्मीनासोबत त्याच्या घरी बसायला आवडते. दिवाळीच्या दिवशी कार्तिक त्याच्या अगदी जवळच्या मैत्रिणी पश्मीनासोबत जुहू येथे त्याच्या नवीन कार मॅकलरेनमध्ये गेला होता’. हेही वाचा -  श्रीदेवीपासून आलियापर्यंत; लग्नानंतर वर्षभरातच आई-बाबा झाले ‘हे’ कलाकार कार्तिक आर्यनच्या प्रोफेशनल लाईफ व्यतिरिक्त त्याच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना खूप उत्सुकता असते. मात्र त्या दोघांना त्यांचं नातं अद्याप उघड करायचं नसल्याचं दिसतंय. कार्तिक आणि पश्मिना रोशन यावर काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पश्मिना ही फिल्ममेकर राजेश रोशन यांची मुलगी आणि स्टार हृतिक रोशनची चुलत बहीण आहे. पश्मिना रोशन देखील लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. ‘इश्क विश्क’ या चित्रपटाच्या सिक्वेल ‘इश्क विश्क रिबाउंड’मध्ये ती दिसणार आहे.

दरम्यान, काही काळापूर्वी कार्तिक आर्यनचे नाव सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबत जोडले गेले होते. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात होते. कार्तिक आणि सारा लव्ह आज कल हा चित्रपट एकत्र करत होते. त्या काळात दोघांच्या प्रेमाचे किस्से सर्वत्र गाजत होते. पण चित्रपट संपताच त्यांचे नातेही संपले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या