JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मराठी सिनेकलाकारांचं पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल, corona virus मुळे होळी सेलिब्रेशन रद्द

मराठी सिनेकलाकारांचं पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल, corona virus मुळे होळी सेलिब्रेशन रद्द

मराठी सिने कलाकारांचं दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारं होळीचं सेलिब्रेशन यंदा रद्द करण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 मार्च : सध्या जगभरात कोरोना व्हायरसनं (corona virus) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अशात सध्या भारतात मात्र होळाच्या सणाची लगबग सुरु आहे. पण कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा होळी खेळणार नसल्याचं ट्विटवरुन सांगितलं होतं. त्यानंतर आता मराठी सिने कलाकारांचं दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारं होळीचं सेलिब्रेशन यंदा रद्द करण्यात आलं आहे. सध्या देशात कोरोना व्हायरसची लागण झालेले 28 रुग्ण आढळल्यानं सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. या व्हायरस हवेतून किंवा लगण झालेल्या माणसांच्या संपर्कातून पसरत असल्यानं यंदा एकत्र येऊन होळी खेळण्याचे कार्यक्रम सर्व ठिकाणी रद्द करण्यात आले आहेत. यात आता मराठी सिने कलाकारांचीही भर पडली आहे. त्यामुळे मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये धामधुमीत खेळला जाणारा रंगांचा उत्सव यंदा खेळला जाणार नाही. यंदा कर्तव्य आहे! 4 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर बॉलिवूड अभिनेता अडकणार विवाहबंधनात

संबंधित बातम्या

कोरोना व्हायरस (Coronavirus) अर्थात COVID-19 च्या संक्रमणामुळे जगभरात 3 हजार 131 माणसांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचा धोका वाढला आहे. अशावेळी वैयक्तिक पातळीवर काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीमधील होळी आणि रंग खेळण्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मराठी मालिकांच्या कलाकारांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही मात्र मराठी सिने कलाकारांची यंदा एकत्र येत होळी खेळणं टाळलं आहे. महाभयंकर कोरोनाची देशभरात भीती, संक्रमणापासून वाचण्यासाठी करा हे उपाय Alert! मुंबईतील कोरोना व्हायरसची ‘ही’ बातमी आहे अफवा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या