JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / shahrukh khan : मक्का मशिदीनंतर किंग खान वैष्णोदेवीच्या चरणी; तो व्हिडीओ व्हायरल

shahrukh khan : मक्का मशिदीनंतर किंग खान वैष्णोदेवीच्या चरणी; तो व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरुख खान कायम चर्चेत असतो. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट ‘पठान’ मुळे चर्चेत आहे.

जाहिरात

शाहरुख खान

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 डिसेंबर : बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरुख खान कायम चर्चेत असतो. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट ‘पठान’ मुळे चर्चेत आहे. पठानमधून तो चार वर्षानंतर पुनरागमन करत आहे. त्यामुळे शाहरुखचे चाहते खूप आनंदी असून त्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अशातच शाहरुख खानविषयी  आणखी एक बातमी समोर आली आहे. शाहरुख खानने नुकतीच वैष्णोदेवीच्या चरणी हजेरी लावली. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख खानने ‘पठान’ चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच जम्मू-काश्मिरमधील वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं. काल रात्री उशीरा तो कटरा येथील माता वैष्णोदेवीच्या पवित्र मंदिरात पोहचला. यादरम्यान शाहरुखने तोंडाला मास्क आणि चष्मा लावला होता जेणेकरुन त्याला कोणी ओळखू नये. त्याचा हा व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधत असून हा व्हिडीओ शाहरुखच्या एका फॅनपेजने शेअर केला आहे. हेही वाचा -  Siddharth Shukla : ‘मी पुन्हा…’ सिद्धार्थच्या आठवणीत शहनाज भावुक; चाहत्यांसोबत शेअर केल्या भावना शाहरुख खानने यापूर्वी मुस्लीम धर्मीयांची मक्का येथील पवित्र मशिदिला भेट दिली होती. शाहरुखचे मक्का मशिदितील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये तो पांढऱ्या रंगाच्या वस्त्रात दिसत होता. यासोबतच त्याने मास्कही घातला होता.

संबंधित बातम्या

दरम्यान,शाहरुख खान शेवटचा आनंद एल राय दिग्दर्शित अनुष्का शर्मासोबत जोरी या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर जवळपास चार वर्षांनी किंग खान मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे, आणि त्याचा पहिला चित्रपट पठाण असेल, जो पुढील महिन्यात थिएटरमध्ये दाखल होईल. पठाणला हिट बनवण्यासाठी शाहरुखने खूप मेहनत घेतली आहे. बॉडी बनवण्यापासून ते चित्रपटाच्या प्रमोशनपर्यंत किंग खान प्रत्येक युक्ती आजमावत आहे.

‘पठाण’ यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनत असून, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करत आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण जगभरातील अनेक विदेशी लोकेशन्सवर झाले आहे. स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त जॉन अब्राहम देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या