JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / केकेनंतर आणखी एका गायकाचा लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का

केकेनंतर आणखी एका गायकाचा लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके यांचाही लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान मृत्यू झाला. आता आणखी एका गायकाचा स्टेज परफॉर्मन्सदरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात

मुरली महापात्रा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 ऑक्टोबर : मनोरंजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ओडिया गायक मुरली प्रसाद महापात्रा यांचे निधन झालं. स्टेजवर परफॉर्मंस करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानं सगळीकडे शोककळा पसरली आहे.  ते रविवारी रात्री ओडिशातील जेपोर शहरात एका कार्यक्रमात लाईव्ह परफॉर्मन्स देत असताना ही दुःखद घटना घडली. कोरापुट जिल्ह्यातील जेपोर शहरातील राजनगर येथे दुर्गापूजेसाठी आयोजित कार्यक्रमात महापात्रा गायन सादर करत होते. दोन गाणी गायल्यानंतर ते स्टेजवर एका खुर्चीवर बसले आणि इतर गायकांना ऐकत होते. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेताला. त्यांच्या जाण्यानं संगीतसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हेही वाचा -  Urmila Matondkar : खासदारकी ही नाही आमदारकीही नाही; उर्मिला मातोंडकरने शेवटी शोधला हा मार्ग मुरली यांचा मोठा भाऊ विभूती प्रसाद महापात्रा यांनी सांगितलं की,  ‘मुरलीला दीर्घकाळापासून हृदयविकार आणि मधुमेहाचा त्रास होता’. मुरली महापात्रा यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. महापात्रा हे ओडिशातील प्रसिद्ध गायक होते. जयपूरमध्ये त्यांना अक्षय मोहंती या नावानं ओळखले जात होते. गायन कारकीर्द सुरू करण्यापूर्वी ते जयपूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून काम करायचे. हेही वाचा -  Tiger Shroff: टायगर श्रॉफला हे काय झालं?, VIDEO पाहून चाहत्यांची चिंता वाढली दरम्यान, बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके यांचाही लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान मृत्यू झाला. त्यांचा कोलकात्यात लाईव्ह परफॉर्मन्ससाठी गेला होता. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने बॉलिवूडला धक्का बसला आहे. केकेच्या दुःखातून बाहेर येत नाही तोच आणखी एका गायकाचं निधन झालंय. त्यामुळे सध्या मुरली प्रसाद महापात्रा यांच्या निधनानं अनेकांना धक्का बसला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या