JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Aditya Roy Kapoor: बॉलिवूडमध्ये पुढचं लग्न अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरचं? अभिनेत्याने उघड केला वेडिंग प्लॅन

Aditya Roy Kapoor: बॉलिवूडमध्ये पुढचं लग्न अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरचं? अभिनेत्याने उघड केला वेडिंग प्लॅन

Aditya Roy Kapoor On Marriage: बॉलिवूडमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कलाकारांच्या डेटिंग, ब्रेकअप आणि लग्नाच्या बातम्या समोर येत असतात. या सेलिब्रेटींच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

जाहिरात

अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 मार्च- बॉलिवूडमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कलाकारांच्या डेटिंग, ब्रेकअप आणि लग्नाच्या बातम्या समोर येत असतात. या सेलिब्रेटींच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. बी टाऊनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दोन सेलिब्रेटींच्या डेटिंगच्या चर्चांनी जोर धरला आहे. हे जोडपं दुसरं कुणी नसून अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे प्रेमात पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता आदित्यने लग्नाबाबत भाष्य करत आपला वेडिंग प्लॅन उघड केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या आपल्या चित्रपटांमुळे नव्हे तर खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अनन्या आणि आदित्य एकेमकांच्या प्रेमात असून दोघेही डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. सोशल मीडियावर सतत त्यांच्याबाबत अनेक अपडेट समोर येत असतात. दरम्यान अनन्या आणि आदित्य सतत एकमेकांसोबत दिसून येत आहेत. (हे वाचा: Akshay Kumar: चित्रपटाच्या सेटवर अक्षय कुमारचा अपघात; टायगरसोबत ‘त्या’ सीनदरम्यान झाली दुखापत ) नुकतंच एका फॅशन ब्रँडने आपल्या शोचं आयोजन केलं होतं. यामध्ये अनेक सेलिब्रेटी सहभागी झाले होते. या सेलेब्रेटींनी सुंदर पोशाखात रॅम्प वॉक करत सोहळ्यात चार चांद लावले होते. दरम्यान एका जोडप्याने फॅशन शोमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आणि ते जोडपं होतं आदित्य आणि अनन्या पांडे. या दोघांनी फॅशन शोमध्ये जोडीने रॅम्प वॉक केला होता. शिवाय अनन्याने आदित्यसोबतचे अनेक सुंदर फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे त्यांच्या अफेयरच्या चर्चंनी आणखीनच जोर धरला आहे. दरम्यान आता आदित्य रॉय कपूरने आपल्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. नुकतंच आपल्या आगामी ‘गुमराह’ या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंग दरम्यान आदित्यने मीडियाशी संवाद साधला, यावेळी त्याला रिलेशनशिप आणि लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. अनन्यासोबत डेटिंगबाबत तर त्याने अद्याप काहीही माहिती दिलेली नाहीय. मात्र लग्नाबाबत स्पष्ट मत मांडलं आहे.

यावेळी बॉलिवूडमध्ये सगळेच लग्न करत आहेत, तू लग्न कधी करणार असा प्रश्न विचारातच आदित्यने म्हटलं, ‘सगळेच लग्न करत आहेत, पण मला याबाबत सध्या काहीच वाटत नाहीय. मी माझा पूर्ण वेळ घेणार. आणि योग्य वेळी लग्न करणार. आता ती योग्य वेळ कधी येणार याबाबत मला अद्याप काहीच कल्पना नाहीय’ असं म्हणत आदित्यने वेळ मारुन नेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या