JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘दे केरला स्टोरी’ फेम अभिनेत्रीनं आषाढी एकादशीनिमित्तानं गायल खास गाणं, Video Viral

‘दे केरला स्टोरी’ फेम अभिनेत्रीनं आषाढी एकादशीनिमित्तानं गायल खास गाणं, Video Viral

अदानं ‘रखुमाई रखुमाई’ गाणं गात आषाढी एकादशीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जाहिरात

‘दे केरला स्टोरी’ फेम अभिनेत्रीनं आषाढी एकादशीनिमित्तानं गायल खास गाणं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जून- ‘दे केरला स्टोरी’ या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे काही व्हिडिओ व फोटो शेअर करत असते. अदाने अनेकदा शाळेत शिकलेल्या मराठी कवितांचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले होते, जे तुफान व्हायरल झाले. अभिनेत्री शाळेत असताना मराठी शिकली होती आणि तिचे या भाषेवरील प्रेम आजही कायम आहे. आषाढी एकादशीनिमित्तानं अदानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अदानं ‘रखुमाई रखुमाई’ गाणं गात आषाढी एकादशीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अदानं शेअर केलेल्या या व्हिडिओ ती युकुलेलं वाजवत ‘रखुमाई रखुमाई’ हे गाणं गाताना दिसतं आहे. हा व्हिडिओ शेअर करत अदानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा” अदाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत तिलाही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय काहींनी तिच्या आवाजाचं कौतुक केलं आहे. अदाच्या या व्हिडीओला अवघ्या लाखोहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

यापूर्वी अदानं हिरव्या नऊवारी साडीतला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओत अदा नऊवारी साडीत नवरीच्या लूकमध्ये दिसतं आहे. तसेच ती एका बाईकवर बसून पोझ देताना पाहायला मिळतं आहे. अदानं हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, “ज्यांनी मला नऊवारी साडी नेसायला सांगितली आणि ‘चिडलेली इडली’, ‘चवळी’ या माझ्या कवितेच्या चाहत्यांसाठी हा माझा लूक.” शिवाय तिनं या व्हिडीओच्या कमेंटमध्ये “कोणाला लिफ्ट पाहिजे?” असाही प्रश्न विचारला आहे. ज्यावर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान The Kerala Story मधील अदाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, या सिनेमात तिने शालिनी उन्नीकृष्णन या मल्याळी नर्सची भूमिका साकारली आहे, जी लव्ह जिहादची बळी ठरते. असे दाखवण्यात आले आहे की शालिनी अफगाणिस्तानात तुरुंगात जाण्यापूर्वी ‘लव्ह जिहाद’ची बळी ठरले आणि ती इस्लाम स्वीकारते, ISIS मध्ये सामील होते. पंढरीची वारी. आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय.. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. ही वारी काही आजची नाही. गेली हजारो वर्षे या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायला लाखों वारकरी पायी वारी करत पंढरपूरला जात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या