JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ...अन् 'या' मराठी अभिनेत्रीने 15 हजार फुटांवरून घेतली उडी, Video Viral

...अन् 'या' मराठी अभिनेत्रीने 15 हजार फुटांवरून घेतली उडी, Video Viral

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री या नेहमीच अभिनयासह अनेक आवडीच्या गोष्टी करताना दिसतात. असंच काहीसं धाडसी पाऊल उचललं आहे अभिनेत्री स्नेहल प्रविण तरडे यांनी!

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 मार्च- मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री या नेहमीच अभिनयासह अनेक आवडीच्या गोष्टी करताना दिसतात. असंच काहीसं धाडसी पाऊल उचललं आहे अभिनेत्री स्नेहल प्रविण तरडे यांनी! सध्या त्या ऑस्ट्रेलियाची सफर करत आहेत आणि ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये त्यांनी स्काय डायव्हिंग केलं आहे. त्यांच्या स्काय डायव्हिंगचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. जागतिक महिला दिनानिमित्त काहीतरी हटके करण्यासाठी स्नेहल तरडे व त्यांच्या मैत्रिणींनी सिंडनीमध्ये तब्बल १५ हजार फुटांवरून उडी मारत स्काय डायव्हिंग केले आहे. त्यांच्यासह अनिता पाटील आणि रूपाली पवार या त्यांच्या मैत्रिणींनीही स्काय डायव्हिंगचा थरार अनुभवला. ‘आम्ही आई जिजाऊच्या लेकी आहोत, १५ हजार फुटावरून काय, ३० हजार फुटावरूनही उडी मारू शकतो… मी उडी मारणार… जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र!’ असं म्हणत स्नेहल स्काय डायव्हिंगसाठी सज्ज झाल्या आणि तब्बल १५ हजार फुटांवरून त्यांनी उडी मारली. त्यांच्या स्काय डायव्हिंगच्या व्हिडिओमध्ये त्या मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. कोणतीही भिती न बाळगता त्यांनी बिनधास्त उडी मारली अन् महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा केला. वाचा- ‘तारक मेहता’ फेम पोपटलालची ऑनस्क्रीन पत्नी सध्या जगतेय असं आयुष्य २ डिसेंबर २००९ साली प्रवीण तरडे व स्नेहल यांनी लग्न केलं. प्रवीण आणि स्नेहल यांना एक मुलगा आहे.  स्नेहल यांनी प्रवीण तरडे यांच्यासोबत काही नाटकात काम केलं आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला आहे.त्याचबरोबर स्नेहल यांनी प्रवीण यांच्यासोबत काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यात, देऊळबंद, चिंटू २ आणि व्हेंटिलेटर या चित्रपटांचा समावेश आहे. स्नेहल तरडे अलीकडेच मु. पोस्ट धर्मवीर आणि सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात झळकल्या होत्या. त्या नेहमीच दर्जेदार भूमिका साकारताना दिसतात.

महिला दिन आज जगभरात उत्साहात साजरा केला जात आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय विविध ठिकाणी महिलांसाठी कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या