JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लॉकडाऊनमध्ये मित्राबरोबर जॉयराइड या अभिनेत्रीला पडली महागात, कारचा भीषण अपघात

लॉकडाऊनमध्ये मित्राबरोबर जॉयराइड या अभिनेत्रीला पडली महागात, कारचा भीषण अपघात

लॉकडाऊमध्ये घराबाहेर पडणं एका कन्नड अभिनेत्रीला चांगलच महागात पडलं आहे. अभिनेत्री शर्मिला मांड्रेचा बेंगळुरूमध्ये भीषण अपघात झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 05 एप्रिल : लॉकडाऊमध्ये घराबाहेर पडणं एका कन्नड अभिनेत्रीला चांगलच महागात पडलं आहे. अभिनेत्री शर्मिला मांड्रेचा बेंगळुरूमध्ये भीषण अपघात झाला आहे. शर्मिलाची कारच्या वसंतनगर परिसरातील अंडरब्रिजवर रेल्वे पिलरला धडकून अपघात झाला आहे. यावेळी तिचा एक मित्र देखील शर्मिलाबरोबर होता. मात्र या अभिनेत्रीवर असा सवाल उपस्थित केला जात आहे की, देशामध्ये लॉकडाऊन असताना गाडी  घेऊन घराबाहेर पडण्याचं एवढं महत्त्वाचं कारण कोणतं होतं? (हे वाचा- कनिकाच्या 5 व्या कोरोना व्हायरस टेस्टचा रिपोर्ट समोर, रुग्णालयाने दिले नवे अपडेट) पीटीआय (PTI) वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री आणि तिचा मित्र लोकेश वसंत या दोघांवर रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी एडीएमए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मिळते आहे की, कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी नव्हे तर जॉयराइडसाठी हे दोघेजण बाहेर पडले होते. मात्र ही जॉयराइड त्यांना चांगलीच महागात पडली आहे. अॅडिशनल कमिशनर ऑफ पोलीस (वाहतूक) रविकांत गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार जॅग्वार गाडीचा अपघात अंडरब्रिजवर रेल्वे पिलरला धडकून झाला आहे.

अभिनेत्री शर्मिला मांड्रेसाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दोघांना फोर्टिस रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनचे नियम तोडून त्यांनी घराबाहेर जाण्याचा निर्णय का घेतला याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार केवळ जॉयराइडसाठी त्यांनी नियम मोडले असतील तर तो अपराध आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. अनेक अहवालांनुसार शर्मिलाकडे कोणताही अत्यावश्यक सेवांसाठी पास नव्हता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या