JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'दंगल' फेम अभिनेत्रीला Lockdown मध्ये गंभीर दुखापत, करावी लागली सर्जरी

'दंगल' फेम अभिनेत्रीला Lockdown मध्ये गंभीर दुखापत, करावी लागली सर्जरी

लॉकडाऊनमुळे घरात एकटीच असेलेली सान्या जेवण बनवत असताना तिच्यासोबत गंभीर दुर्घटना घडली असून तिच्यावर सर्जरी करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मे : लॉकडाऊनमुळे मागच्या बऱ्याच काळापासून सर्वजण आपापल्या घरी बंद आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी असे आहेत ज्यांची फॅमिली मुंबईमध्ये नाही आणि लॉकडाऊनमुळे सध्या ते मुंबईतील त्यांच्या फ्लॅटवर एकटेच आहेत. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे सान्या मल्होत्रा. लॉकडाऊनमुळे घरात एकटीच असेलेली सान्या जेवण बनवत असताना तिच्यासोत गंभीर दुर्घटना घडली ज्यातून ती थोडक्यात बचावली. पण यात ती जखमी झाली असून बराच रक्तस्राव झाला. मात्र तिच्यावर सर्जरी करण्यात आली. पण हे सर्व तिच्याच लहानशा चुकीमुळे घडलं. सान्या मल्होत्रा ही दुर्घटना तेव्हा घडली जेव्हा ती किचनमध्ये चटणी बनवत होती. दंगल सिनेमातून आपल्या अभिनयची छाप पाडणाऱ्या सान्यासोबत ही दुर्घटना 14मे ला घडली. ब्लेंडर वापरत असताना तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. ज्यामुळे तिच्या हातावर सर्जरी करावी लागली. याची माहिती सान्यानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे. आता मुंबई मिररनं याबाबतचं संपूर्ण वृत्त प्रकाशित केलं आहे. अजय देवगणमुळे आजही अविवाहित आहे तब्बू; म्हणाली, मी त्याच्यावर खूप…

मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार लॉकडाऊनच्या दरम्यान जेव्हा सान्या तिच्या घरी एकटी होती आणि ती ब्लेंडरमध्ये चटणी बनवत होती. तिनं जार मशीनवर ठेवला मात्र त्याचं झाकण लावण्याआधीच तिनं मशीन चालू केली आणि ही दुर्घटना घडली. जेव्हा ती झाकण लावण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा चुकून तिचा हात ब्लेंडरमध्ये गेला आणि तिच्या बोटांना गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. ज्यामुळे तिला चक्कर आली आणि बेशुद्ध होत होती. अशा परिस्थितीतही तिनं तिच्या एका मित्राला फोन करून त्याच्याकडे मदत मागितली. यानंतर तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या ठिकाणी तिची कोरोना टेस्ट सुद्धा करण्यात आली. ज्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. मात्र तिच्या तीन बोटांना गंभीर दुखापत झाली होती आणि या रिकंस्ट्रक्शनसाठी तिच्या बोटांवर सर्जरी करण्यात आली. तापसी पन्नूवर कोसळला दुःखाचा डोंगर, खास व्यक्तीनं घेतला जगाचा निरोप लॉकडाऊनमध्ये बिग बींसोबत घडलं असं काही, जे याआधी 78 वर्षांत कधीच झालं नाही

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या