JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'अब पैसा कौन देगा रे'; चक्क प्रिया बापटला पडली मदतीची गरज,असं काय घडलं?

'अब पैसा कौन देगा रे'; चक्क प्रिया बापटला पडली मदतीची गरज,असं काय घडलं?

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat). उत्तम अभिनयसोबतच प्रिया तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते.

जाहिरात

priya bapat

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 ऑगस्ट : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat). उत्तम अभिनयसोबतच प्रिया तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते.सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. नुकताच प्रियानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोला दिलेल्या भन्नाट कॅप्शननं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. प्रियानं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिची मोठी बॅगही पहायला मिळतेय. मात्र मोठी बॅग आणली तरीही तिची फजिती झाल्याचं पहायला मिळत आहे. प्रियासोबत नक्की काय घडलंय हे तिनं फोटोला दिलेल्या कॅप्शनवरुन सांगितलंय. ‘जेव्हा तुम्ही मोठी बॅग आणता मात्र पैशांचं पॉकेटच आणायला विसरता, तेव्हा काहीशी अशी अवस्था होती - अब पैसा कौन देगा रे’. फोटोमध्ये प्रियानं हावभावही एकदम ऑन पॉइंट दिले आहेत. प्रियाच्या या मजेशीर पोस्टवर सध्या चाहत्यांच्या अनेक भन्नाट प्रतिक्रिया येत आहे. हेही वाचा -  ‘साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला’; वीणा जगतापचा पारंपारिक LOOK प्रियानं अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. त्याचबरोबर ती हिंदी वेबसिरिजमध्येही झळकली आहे. त्यामुळे प्रियाचा चाहता वर्ग काही कमी नाही. तिनं तिच्या अभिनयानं चाहत्यांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयासोबत प्रिया तिच्या हटके फॅशनमुळेही चर्चेत असते. नेहमीच वेगळ्या लूकमध्ये ती फोटो पोस्ट करुन चाहत्यांना घायाळ करत असते.

संबंधित बातम्या

दरम्यान, प्रियाला फिटनेसचही खूप वेड आहे. प्रिया जेवढी तिच्या कामविषयी चर्चेत असते तेवढीच ती तिच्या फिटनेसविषयीही चर्चा होत असते. ती फिटनेसविषयीही खूप जागरूक आहे. ती सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते ज्यामध्ये ती तिच्या फिटनेस दाखवत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या