JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन झाली आई, शेअर केला बाळाचा पहिला फोटो

अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन झाली आई, शेअर केला बाळाचा पहिला फोटो

अ‍ॅमीनं नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला असून तिनं बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 सप्टेंबर : अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन मागच्या बऱ्याच काळापासून तिच्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत होती. अ‍ॅमी जॅक्सन आणि तिचा बॉयफ्रेंड जॉर्ज पानायियोतो यांनी ज्या दिवसाची आतुरता होती तो दिवस अखेर आला असून अ‍ॅमीनं नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अ‍ॅमीनं मुलाचं नाव अ‍ँड्रियास असं ठेवलं असून डिलव्हरी नंतर तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिचा होणारा नवरा तिच्या कपाळाचं चुंबन घेताना तर अ‍ॅमी बाळाला दूध पाजताना दिसत आहे. या फोटो शेअर करताना अ‍ॅमीनं लिहिलं, ‘या जगात तुझं स्वागत आहे माझ्या लहानग्या अँड्रियास’

याशिवाय अ‍ॅमीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या बाळाचा पहिला फोटोसुद्धा शेअर केला आहे. हा फोटो शेअर करतना तिनं लिहिलं, ‘Hi World!’ अ‍ॅमीच्या बाळाचा हा गोड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अ‍ॅमीचे सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईक तिच्या बाळाला शुभेच्छा देताना दिसत आहेत. हा क्षण अ‍ॅमीसाठी खूप खास आहे. सध्या ती तिचं मातृत्व एंजॉय करत आहे. बाळाच्या जन्माचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. पतीसाठी ओक्साबोक्शी रडली राखी सावंत; म्हणाली तुम्हाला माझी जराशीही दया येत नाही? अ‍ॅमी प्रेग्नन्सी दरम्यान सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. तिनं बेबी शॉवरचे फोटो सुद्धा शेअर केले होते. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते कारण यावेळी तिनं आपण मुलाला जन्म देणार असल्याचं तिनं जाहिर केलं होतं. अ‍ॅमी आणि जॉर्ज यांचं हे पहिलं बाळ आहे. हे दोघंही 2015 पासून एकमेकांना डेट करत असून त्यांनी अद्याप लग्न केलेलं नाही. 2019च्या जानेवारीमध्ये या दोघांनी त्याच्या साखरपुड्याची बातमी शेअर केली होती. बॉलिवूडच्या या अभिनेत्याने बायकोला ठेवलं होतं बॉइज हॉस्टेलमध्ये आणि…

जाहिरात
जाहिरात

अ‍ॅमीच्या प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचं तर प्रेग्नन्सी अगोदर ती रजनीकांतच्या 2.0 मध्ये दिसली होती. याशिवाय तिनं बॉलिवूडच्या सिंग  इज ब्लिंगमध्येही काम केलं आहे. या सिनेमात तिनं अभिनेता अक्षय कुमार सोबत स्क्रिन शेअर केली होती. ‘एक दीवाना था’ या सिनेमातून तिनं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. प्रेग्नन्सीनंतर मात्र तिनं कामातून पूर्णपणे ब्रेक घेतला होता. Saand Ki Aankh: तीन चार की जिंदगी बनान खातर एककी जान लेनी पड़े तो कोई हरज ना है ====================================================== स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या