Amruta Subhash
मुंबई 15 ऑगस्ट: अमृता सुभाष ही अभिनेत्री सध्या एका खास कारणाने चर्चेत येत आहे. अमृता नेहमीच तिच्या चाहत्यांना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत असते. तिची प्रत्येक भूमिका तिला आणखी जास्त लोकप्रियता आणि प्रेम मिळवून देत असते. सध्या अमृताने आजीशी निगडित एक आठवण शेअर केली आहे जी सगळ्यांचं मन जिंकून घेत आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत अमृताने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या आजीबद्दल एक आठवण शेअर करत आहे. तुम्हाला माहित आहे का की अमृताची आजी ही स्वातंत्र्यसेनानी होती आणि तिने देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन अनुभवला आहे? आजीच्या प्रतिमेसमोर दिवा लावून अमृता असं सांगते, “माझी आजी ही एक स्वातंत्र्यसेनानी होती. 31 जुलै 1947 रोजी माझ्या आईचा जन्म झाला. आणि बरोबर पंधरा दिवसांनी देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळी माझी आजी तिच्या 15 दिवसाच्या मुलीला दुपट्यात गुंडाळून ठेवून देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करायला सहभागी झाली होती. देश स्वतंत्र झाल्यावर पहिलं राष्ट्रगीत आणि झेंडावंदन झालं तेव्हा माझी आजी ते अनुभवायला उपस्थित होती. ही आठवण मला आई आणि आजी दोघीनी सांगितली आहे.”
अमृताची आई म्हणजे ज्योती सुभाष. ज्योती सुभाष सुद्धा एक प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. त्यांनी सिनेसृष्टीत एक मोठी कारकीर्द घडवली आहे. नुकतीच त्यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. ज्योती या सुद्धा नेहमीच ऍक्टिव्ह आणि वर्क फ्रंटवर आजही कार्यरत आहेत. अमृताने सांगितलेल्या आठवणीत ज्योती यांचा उल्लेख असल्याने या निमित्ताने तिच्या आयुष्यातील एक गोड क्षण चाहत्यांना अनुभवायला मिळाला आहे. अमृताचा हा अंगाला वेगळा किस्सा चाहत्यांना फारच आवडला आहे. स्वातंत्र्यदिनाशी तिचं एक स्पेशल नातं यानिमित्ताने ऐकायला मिळालं आहे. हे ही वाचा- Independence day 2022: मराठी कलाकारांचा अमेरिकेत डंका; कार्यक्रमाला ‘या’ कलाकारांची उपस्थिती अमृता नुकतीच एका सुंदर वेबसिरीजमधून समोर आली. ‘सास बहु आचार प्रायव्हेट लिमिटेड’ असं या सिरीजचं नाव असून यामध्ये सासू सुनेचं एक गोड नातं बघायला मिळालं होतं. याशिवाय अमृता सध्या पुनःश्च हनिमून नाटकात आपला नवरा संदेश कुलकर्णी सह दिसून येत आहे. तिच्या नाटकाचे तुफान प्रयोग होताना दिसत आहेत.