JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमान खान पोलीस आयुक्तांच्या भेटीला; 'त्या' धमकीच्या पत्राचा उल्लेख करीत केली मोठी मागणी

सलमान खान पोलीस आयुक्तांच्या भेटीला; 'त्या' धमकीच्या पत्राचा उल्लेख करीत केली मोठी मागणी

या भेटीत पोलीस आयुक्तांकडून सलमान खानने (Actor Salman Khan met Mumbai CP Vivek Phansalkar ) मोठी मागणी केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जुलै : अभिनेता सलमान खान याने काही वेळापूर्वी पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सलमान खान त्यांच्या भेटीसाठी आला आहे. गेल्या महिन्यात बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकीचं पत्र आलं होतं. गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील ( salman khan threat case ) आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार गुंड विक्रम बराड (Vikram Barad) यानेच हे धमकीचं पत्र सलमान खान यांचे वडील सलीम खान यांच्यापर्यंत पोहोचवलं होतं, अशी माहिती काही दिवसापूर्वी समोर आली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान याने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. यावेळी त्याने धमकीच्या पत्राचाही उल्लेख केला. धमकीच्या पत्रानंतर सलमान खानने बंदुकीचा परवाना मिळवण्यासंदर्भात पोलिसांकडे अर्ज दिला आहे. स्वत:च्या सुरक्षेसाठी त्याने बंदूक बागळण्यासाठी परवानगी मागितली आहे. यावेळी साधारण 15 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. पाच जूनला मिळालं होतं धमकीचं पत्र सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना रविवारी (5 जून) धमकीचं पत्र मिळालं होतं. ‘सलमानचाही सिद्धू मूसेवाला करू’, अशी धमकी त्याला देण्यात आली होती. या धमकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला मिळताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर क्राईम ब्राँचची ( Mumbai Crime Branch) एक टीम तात्काळ दाखल झाली होता. ज्या ठिकाणी धमकीचं पत्र मिळालं त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास सुरु होता. सलमान स्वत: घराबाहेर येऊन क्राईम ब्राँचच्या टीमला सहकार्य करताना दिसला होता. सलीम खान यांच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याला धमकीचं पत्र सापडलं होतं. सलीम खान वॉकला गेल्यानंतर दररोज जिथे रोज विश्रांती करतात तिथे एका बेंचवर हे पत्र सापडलं आहे. या पत्रात सलमान आणि सलीम खान दोघांना गंभीर धमक्या देण्यात आल्या आहेत. “मुसावला जैसा कर दुंगा”, अशा आशयाचं ते पत्र होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या