JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बाथरूममध्ये पडून चाहत्याचा अपघाती मृत्यू, धक्कादायक बातमी ऐकून रणवीर झाला भावुक

बाथरूममध्ये पडून चाहत्याचा अपघाती मृत्यू, धक्कादायक बातमी ऐकून रणवीर झाला भावुक

रणवीर नेहमीच आपल्या चाहत्यांना महत्त्व देताना दिसतो. मात्र नुकतचं त्यानं एका चाहत्याला कायमचं गमावलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जून : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह बराच मोठा चाहता वर्ग असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. यशाच्या शिखरावर असलेला रणवीर नेहमीच आपल्या चाहत्यांना महत्त्व देताना दिसतो. मात्र नुकतचं त्यानं त्याच्या एका चाहत्याला कायमचं गमावलं आहे. रणवीरचा एक चाहता, जतिन दुलेराचा बाथरुममध्ये घसरुन पडल्यानं मृत्यू झाला आहे. जतिनच्या जाण्यानं रणवीरला खूप दुःख झालं असून त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जतिन सोबतच्या फोटोंचं कोलाज शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली. ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला कॉपी केल्यानं मलायका अरोरा होतेय ट्रोल रणवीरनं त्याच्या चाहत्याच्या अचानक मृत्यूचं दुःख व्यक्त केलं आहे. त्यानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जतिनच्या फोटोंचं कोलाज शेअर करताना लिहिलं, ‘RIP LIL HOMIE.’ रणवीरच्या या फॅनच्या मृत्यूची ही खबर विराल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केली. त्यांनी लिहिलं, रणवीर सिंहचा चाहता जतिन दुलेराचा एका अचानक झालेल्या अपघातात मृत्यू झाला. तो ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असताना अचानक बाथरुममध्ये पाय घसरुन पडला आणि श्वास रोखला गेल्यानं त्याचा मृत्यू झाला. विराल भयानी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, जतिनं एक चांगला मुलगा होता. त्याला कोणत्यही प्रकारचं व्यसन नव्हतं. त्याच्या बालपणीच त्याच्या वडीलांचा मृत्यू झाला होता. जतिनची आई सरकारी कार्यालयात कामाला आहे आणि जतिन वांद्र्यातील एका बिल्डींगमध्ये काम करत होता. या ठीकाणी अभिनेता फरहान अख्तरचंही ऑफिस आहे. जतिनवर शिवाजी पार्कमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. VIRAL VIDEO : बँकॉकच्या गल्लीत कपडे विकताना दिसली ‘भारत’ची ही अभिनेत्री

रणवीर सिंहच्या आगामी सिनेमांविषयी बोलायचं तर रणवीर सध्या ‘83’ सिनेमाची तयारी करत आहे. हा सिनेमा 2020मध्ये 10 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमामध्ये रणवीर प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 1983मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारतानं साकारलेल्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. हेजलच्या आधी या अभिनेत्रींसोबत रंगली युवराजच्या प्रेमाची चर्चा!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या