मुंबई, 17 एप्रिल : चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसनं आता जवळापास संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. सध्या संपूर्ण देशभरात करोना व्हायरसचे 13,500 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही रुग्ण संख्या वाढत आहे. करोना व्हायरसमुळे देशात आतापर्यंत 449 जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच एका बॉलिवूड अभिनेत्यानं सोशल मीडियाद्वारे जगाला संकटात टाकणाऱ्या चीनचं टिकटॉक अॅप बंद करण्याचे आवाहन लोकांना केले आहे. सर्वांनाच माहित आहे की टिक-टॉक अॅप हे चायना मेड आहे आणि ज्या चीननं कोरोना व्हायरसमुळे जगाला संकटात टाकलं त्या देशाच्या अॅपला बॅन करा असं आवाहन अभिनेता कुशल टंडननं केलं आहे. कुशालने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने भारतीय लोकांना टिक-टॉक अॅप वापरणे बंद करण्याचे आवाहन केले आहे. गोल्ड मेडलिस्ट आहे ‘महाभारत’ची गांधारी, ओळखू येणार नाही एवढा बदलला लुक
कुशलनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘सध्या संपूर्ण जग हे चीनमुळे संकटात आहे. मग टिक-टॉक अॅपद्वारे भारतीय आणि इतर लोक त्यांना पैसे का कमवून देत आहेत. ज्या लोकांना काम नाहीत अशा लोकांसाठी चीनने हे अॅप बनवले आहे आणि आपण सगळेच टिक-टॉक वापरतो. टिक-टॉक अॅप वर बंदी आणा. ते अॅप मी आतापर्यंत कधी वापरले नाही. त्यामुळे मला माझा अभिमान वाटतो असे कुशल म्हणाला आहे. सुशांत सिंह राजपूतसोबतच्या रिलेशनशिपवर रिया चक्रवर्तीनं सोडलं मौन, म्हणाली…
कुशलच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. एका यूजरनं लिहिलं, खरंच टिक-टॉकवर बंदी आणा, तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, हो खरंच बॅन केले पाहिजे. कुशलची ही पोस्ट सगळीकडे व्हायरल होत असून त्याला सोशल मीडियावर पाठिंबा मिळत आहे. राखी सावंतनं 8 महिन्यांनंतर शेअर केला लग्नाचा फोटो, नवराही दिसला सोबत