JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Hardeek Joshi Akshaya Deodhar: राणादा पाठक बाईंची लगीनघाई लवकरच; केळवणाला झाली सुरुवात

Hardeek Joshi Akshaya Deodhar: राणादा पाठक बाईंची लगीनघाई लवकरच; केळवणाला झाली सुरुवात

हार्दिक आणि अक्षया यांच्या लगीनघाईला सुरुवात झाल्याचं समोर आलं आहे. लवकरच हे कपल विवाहबंधनात अडकणार असं सांगण्यात येत आहे.

जाहिरात

Akshaya Deodhar and Hardeek Joshi

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 14 ऑगस्ट: झी मराठीवरील गाजलेली मालिका तुझ्यात जीव रंगला मध्ये राणादा आणि पाठकबाईंची जोडी एकदम हिट झाली होती. त्यांच्या प्रेमकहाणीला भरभरून प्रेमसुद्धा मिळालं होतं. आता हे रीळ लाईफ कपल रियल लाईफमध्ये सुद्धा एकमेकांशी लग्न करणार आहेत. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा पार पडला असून आता त्यांच्या लगीनघाईचे वेध लागले आहेत. हार्दिक आणि अक्षया लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत हे नक्की असलं तरी त्यांच्या वेडिंग डेटबद्दल कोणताही अपडेट समोर आलेला नाही. पण या जोडीच्या लगीनघाईला सुरुवात झाल्याचं मात्र समोर आलं आहे. हार्दिक आणि अक्षया यांचं पहिलं वहिलं केळवण आज पार पडलं असून अक्षयाने याबद्दल फोटो शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे. अक्षया आणि हार्दिक यांचं केळवण कोकणात पार पडलं असून दोघेही यावेळी पारंपरिक वेशात दिसून आले. हार्दिक निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये तर अक्षया निळ्या साडीमध्ये दिसून आली. दोघांनी यावेळी अगदी मॅचिंग कपडे घालून कपलगोल्स दाखवून दिले आहेत.

सध्या अक्षया आणि हार्दिक दोघेही वर्क फ्रंटवर बरेच ऍक्टिव्ह आहेत. हार्दिक आणि अक्षया दोघांचीही नावं बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये असणार अशा बातम्या जोर धरत आहेत. हार्दिकचं नाव तर या चर्चांमध्ये अगदी सुरुवातीपासून आहे. हे ही वाचा- Ajinkya Raut: ‘मन उडू उडू झालं’ फेम इंद्रा सिनेमातल्या किसिंग सीनसाठी कसा झाला तयार? समोर आली Inside Story तसंच हे कपल या वर्षात लग्न करणार असं सुद्धा सांगितलं जात आहे. त्यामुळे आता हार्दिक नेमका बिग बॉसमध्ये जाणार का हे लवकरच समजेल. सध्या हे दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबत क्युट पोस्ट शेअर करताना दिसत असतात. तसंच दोघे एकत्र एका सिनेमातही दिसणार आहेत. हार्दिक आणि अक्षया इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय आहेत. दोघेही साखरपुड्यापासून नेहमीच एकमेकांशी निगडित अपडेट शेअर करत आले आहेत. सध्या त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. त्यांच्या लाडक्या राणादा आणि अंजलीबाईंना एकत्र बघायला चाहते उत्सुक झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या