मुंबई, 21 नोव्हेंबर : ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) चा दिवसेंदिवस टीआरपी घसरत आहे. आता शोला अधिक रंजक बनवण्यासाठी व शोचा टीआरपी उंचवण्यासाठी वाईल्ड कार्ड एंट्री (Wild Card Entry) होणार आहे. एक-दोन नव्हे तर अनेक स्पर्धक घरात येणार आहेत. यापैकी सर्वात चर्चेत आणि फेमस नाव ‘बिग बॉस मराठी २’ चा स्पर्धक अभिजीत बिचुकले याचे आहे. नुकतीच ‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्री रश्मि देसाई, देवोलीना आणि अभिजित बिचुकले 3 स्पर्धकांची एंट्री झाली आहे. यावेळी अभिजित बिचुकलने **(abhijeet bichukale )**त्याच्या नेहमीच्या स्टाईलने सलमानसमोर ओळख करून दिली. बिचुकलेची ओळख परेड ऐकून सलमान देखील दचकला. महेश मांजरेकर देखील यावर गंमतीने म्हणताना दिसतायत की, बिचुकले तुला पाहून मी दचकुले..यावरून एकच लक्षात येत की मराठीनंतर आता बिचुकले हिंदीत देखील राडा करणार हे नक्की. शनिवारी ‘वीकेंड का वार स्पेशल’ला आलेले अभिनेते महेश मांजरेकर यांनी ‘बिग बॉस 15’चा होस्ट सलमान खानला अभिजित बिचुकले विषयी सांगितले. बिचुकलेने कशाप्रकारे ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा पूर्ण नकाशा बदलून टाकला होता. कदाचित बिग बॉस 15 मध्येही तो हेच करेल, असे मांजरेकर म्हणाले. ‘आय अॅम अ आर्टिस्ट, आय अॅम अ रायटर, आय अॅम अ पोएट, आय अॅम अ सिंगर, आय अॅम अ कम्पोझिशन मेकर, आय वाँट टू बी अ बिकम…’ अशा शब्दांत बिचुकलेने स्वत:ची ओळख करून दिली. त्यावर मांजरेकर ‘यू वाँट टू बिकम प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया’ अशी पुस्ती जोडली आणि बिचुकले त्यावर लगेच ‘येस’ त्यावर म्हणाला. बिचुकलेचा हा ‘कॉन्फिडन्स’ पाहून अभी बोल क्या करेगा तू… असं मांजरेकर सलमानला म्हणाले. सलमानही त्याला पाहून दचकला. बिचुकलेकडे तो नुसता पाहत राहिला होता. त्याला काय बोलायचे ते समजत नव्हते. वाचा :अभिजित बिचुकलेची Bigg Boss 15 मध्ये होणार वाइल्ड कार्ड एंट्री अभिजित बिचुकले एकदा कारागृहातही गेला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या सेटवरून त्याला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी अभिजित चेक बाऊन्सच्या प्रकरणात अडकला होता. अभिजित बिचुकले कोण आहे?
अभिजित बिचुकले हा पश्चिम महाराष्ट्रात सातारा येथे राहतो. त्यानं प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आजवर अनेक स्टंट केले आहेत. स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकले यानं आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यानं कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.अभिजीत बिचुकले यानं आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी त्याला एकदाही यश आलेलं नाही. मात्र, तरीही हार न मानता त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. ‘2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार’, असं बेधडक वक्तव्यही त्यानं केलं होतं. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज भरताना अनामत रक्कम भरली जाते. या लोकसभा निवडणुकीत त्यानं अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यानं अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500रुपयांची चिल्लर जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली होती.