JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सर तुम्ही खूप काही शिकवलं...' मराठीच्या शिक्षकांच्या निधनानंतर आमीर खानची भावुक पोस्ट

'सर तुम्ही खूप काही शिकवलं...' मराठीच्या शिक्षकांच्या निधनानंतर आमीर खानची भावुक पोस्ट

अभिनेता आमीर खानने त्याच्या मराठीच्या शिक्षकांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 सप्टेंबर : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शिक्षक आवश्यक असतात. शिक्षक केवळ विद्यार्थ्याला घडवत नाहीत, तर त्याला समाजात वावरण्यासाठी चांगला माणून बनवायला शिकवतात. अशा शिक्षकांना शक्यतो कुणीच विसरत नाही. अशीच प्रचिती अभिनेता आमीर खान (Aamir Khan) मुळे आली आहे. अभिनेता आमीर खानने त्याच्या मराठीच्या शिक्षकांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. आमीरचे मराठीचे शिक्षक सुहास लिमये यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आमीरने एक भावुक ट्वीट केले आहे आणि लिमये सरांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

संबंधित बातम्या

आमीर खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘काल माझे मराठीचे शिक्षक श्री. सुहास लिमये यांच्या निधनाची वार्ता ऐकून मला खूप दु:ख झाले आहे. सर तुम्ही माझ्या सर्वोत्तम शिक्षकांपैकी एक होता. तुमच्या बरोबरचा प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेतला. तुमची उत्सुकता, तुमची शिकण्याची आणि ते वाटण्याची इच्छा यामुळेच तुम्ही नेहमी एक विलक्षण शिक्षक राहिला आहात. आपण एकत्र घालवलेली 4 वर्ष खूप आठवणीत राहतील. तुम्ही मला केवळ मराठी नाही तर अन्य गोष्टीही शिकवलात. धन्यवाद. तुम्ही नेहमीच आठवणीत राहाल.’ (हे वाचा- अजय देवगणनंतर आता प्रभासशी दोन हात करणार सैफ, करीना म्हणाली- सर्वात हँडसम DEVIL ) (हे वाचा- सुशांतच्या कुटुंबाने नव्हते म्हटले आत्महत्या आहे, पोलिसांनी जबरदस्ती घेतली सही) आमीर खानने त्याच्या शिक्षकांबद्दल अशी भावुक पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान अभिनेता आमीर खानच्या लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chaddha) या सिनेमाचे शूटिंग सध्या सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या