JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: Aamir Khan सोबत मुलगी इराने केलं असं काही की तो झोपू शकला नाही

VIDEO: Aamir Khan सोबत मुलगी इराने केलं असं काही की तो झोपू शकला नाही

Aamir Khanची मुलगी इरा खानने तिला चांगली त्वचा मिळाल्याचं श्रेय वडिलांना दिलं आहे. तसेच ते ओव्हर प्रोटेक्टिव्ह असल्याचंही तिने सांगितलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 जून- सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खानने तिला चांगली त्वचा मिळाल्याचं श्रेय वडिलांना दिलं आहे. तसेच ते ओव्हर प्रोटेक्टिव्ह असल्याचंही तिने सांगितलं. इराने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आमिरसोबतचा एक व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये इरा गवतावर शांतपणे झोपलेल्या आमिरला गुदगुल्या करून त्रास देऊन उठवताना दिसत आहे. तिच्या या त्रासाला कंटाळून आमिर तिला म्हणतो की, मी स्वतःच उठतो आहे. आपल्या या पोस्टला कॅप्शन देताना इराने लिहिले आहे की, ‘तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती आहात. जेव्हा मला तुमची गरज असते तेव्हा तुम्ही नेहमीच माझ्यासाठी उभे असता. तुमच्या आसपास असताना कसं वाटतं हा प्रश्न मला अनेकजण विचारतात. काहींना हे फारच कूल आणि एक्सायटिंग वाटतं. पण फक्त हेच वाटणं चुकीचं आहे.’ हेही वाचा-  भाच्याच्या बर्थडेमध्ये सलमान खानने केला स्टंट, हा मजेशीर VIDEO एकदा पाहाच ‘माझ्या आयुष्यात एक शिक्षक, प्रेरणादायी व्यक्ती होण्यासाठी तुमचे आभार. मला चांगल्या त्वचेसाठी जीन्स दिल्याबद्दल तुमचे आभार. फादर्स डेच्या शुभेच्छा.’ इराही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रीनाची मुलगी आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून लाइक आणि शेअरही केला आहे. अनेकांनी या पोस्टवर अनेक सकारात्मक कमेंट केल्या आहेत.

एका युझरने लिहिले की, ‘फार सुंदर व्हिडिओ आहे. वडील आणि मुलगी दोघंही फार छान दिसत आहेत.’ दुसऱ्या युझरने लिहिले की, ‘आमिर हा पृथ्वीवरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे.’ तर तोकडे कपडे घालून वडिलांना गुदगुल्या करणाऱ्या इरावर एक युझर भडकला आणि या देशातले बनावट मुल्ला- मौलवी गरीब मुस्लिम मुली आणि सुनांना बुरख्याचं ज्ञान देतात. तुम्हाला ते लागू होत नाही का असा प्रश्न त्यांनी विचारला. हेही वाचा-  VIDEO: मैदानात रणवीरने विराटला मारली मिठी, दिल्या विजयाच्या अनोख्या शुभेच्छा VIDEO : नवी मुंबईत शाळेजवळ आढळली बाँब सदृश वस्तू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या